सायबर व डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने सायबर गुन्ह्यांमध्येही मोठी वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगार अनेक प्रकारे तुमचा महत्त्वपूर्ण डेटा, ओळख याचा वापर करुन नुकसान करु शकतो. हे टाळण्यासाठी सायबर विमा घेणे हा शहाणपणाचा निर्णय ठरु शकतो.
सायबर विमा म्हणजे काय
सायबर विम्यामध्ये सायबर फसवणुकीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसह थर्ड पार्टी दाव्यांमुळे उद्भवलेल्या आर्थिक दायित्वांचा समावेश होतो. सर्वसमावेशक सायबर विमा योजनेत सायबर हल्ल्याचा बळी ठरल्यानंतर मानसिक आघात, तणाव किंवा भीती यासाठी घेतलेल्या वैद्यकीय समुपदेशनाचाही समावेश होतो.
( हेही वाचा :‘अल- कायदा’ची काश्मीरवर वक्रदृष्टी; संयुक्त राष्ट्राचा अहवाल, भारताची चिंता वाढणार )
विम्यामध्ये कव्हर होणा-या महत्त्वाच्या गोष्टी
- ई-मेल स्पूफिंग, फिशिंगमुळे झालेले नुकसान.
- बॅंक खाती, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड किंवा ई- वाॅलेटद्वारे ऑनलाईन व्यवहारांमध्ये फसवणूक.
- गोपनीय माहिती चोरुन सामाजिक प्रतिष्ठेला नुकसान.
- स्वत: ची माहिती चोरल्यानंतर खटल्याच्या खर्चाशी संबंधित नुकसान.
- डेटा किंवा संगणक प्रोग्रामचे नुकसान झाल्यानंतर, ते पुन्हा स्थापित करण्यासाठी लागणारा खर्च.
- दाव्यानंतर न्यायालयात हजर राहण्यासाठी प्रवासात झालेला खर्च.