Independence Day Ceremony : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात कर्नल नरेंद्रनाथ सुरी यांच्या हस्ते ध्वजारोहण

315
Independence Day Ceremony : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात कर्नल नरेंद्रनाथ सुरी यांच्या हस्ते ध्वजारोहण

दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात ७७ वा स्वातंत्र्यदिन (Independence Day Ceremony) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वरिष्ठ लष्करी अधिकारी कर्नल नरेंद्रनाथ सुरी ( निवृत्त) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. महाराष्ट्र मिलिटरी स्कूल, तळवली, मुरबाड येथील विद्यार्थ्यांनी ध्वजाला सलामी दिली.

यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे (Independence Day Ceremony) कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कार्यवाह राजेंद्र वराडकर, फडके लॅबचे डॉ. अविनाश फडके, समर्थ व्यायाम मंदिराचे उदय देशपांडे, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सभासद आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(हेही वाचा – Tomato : केंद्र सरकारचे नाफेड आणि NCCF ला ५० रुपये प्रती किलोने टोमॅटो विकण्याचे निर्देश)

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात ध्वजारोहण (Independence Day Ceremony) हे नेहमी भारतीय सैन्यदलातील कर्तुत्त्ववान सैनिकांच्या हस्ते केले जाते. महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचे विद्यार्थी येथे दरवर्षी पथसंचलन करतात. सैन्यदले ही भारताची ताकद आहे. त्यांच्या बळावर भारताने आजवर देशाची अखंडता टिकवून ठेवली आहे. एखाद्या देशातील सैन्यदले जेव्हा कमजोर होतात, तेव्हा त्या देशाचे अधःपतन सुरू होते असे म्हटले जाते. पण, आम्ही सैनिक घडवण्याचे काम करतो आहोत. महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचे विद्यार्थी हे देशाचे भावी सेवक आहेत. त्यामुळे कर्नल सुरी, आपली परंपरा हे विद्यार्थी अखंड सुरू ठेवतील, अशी ग्वाही यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी दिली.

शिस्तबद्ध पथसंचलन

महाराष्ट्र मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शिस्तबद्ध पथसंचलनाने (Independence Day Ceremony) उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्क भोवती पथसंचलन केले. साहसी खेळ आणि योग प्रात्यक्षिके सादर झाल्यानंतर कार्यक्रमाची समाप्ती झाली.

भारतात एकोपा टिकला नाही तर…

– मी ३० वर्षे लष्करात आणि २५ वर्षे कॉर्पोरेट क्षेत्रात सैनिकी सेवा बजावत आहे. माझा जन्म सध्या पाकिस्तानात असलेल्या पेशावरमध्ये झाला. १९४७ मध्ये मी एक वर्षांचा होतो. फाळणीच्या वेळी आम्ही पेशावरहून उत्तर प्रदेशात आलो.
– आज भारताला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्षे झाली असली, तरी आपण गुलाम का झालो, याचा इतिहास विसरून चालणार नाही. आपला देश ५०० हून अधिक प्रांतांमध्ये विभागलेला होता. त्यातील प्रत्येकाला स्वतःचा प्रांत आणि अस्तित्त्व वाचवायचे होते. त्यामुळे परस्परांमध्ये भांडणे होती. आपल्यात एकोपा नसल्यामुळे परकीय आक्रमकांचे फावले.
– आधी मुस्लिम राजवटी आणि नंतर ब्रिटिशांनी भारतावर राज्य केले. त्यामुळे यापुढेही देशात एकोपा टिकवणे, ही आपली जबाबदारी आहे, असे मत वरिष्ठ लष्करी अधिकारी कर्नल नरेंद्रनाथ सुरी ( निवृत्त) यांनी यावेळी व्यक्त केले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.