दरवर्षीप्रमाणे या वर्षीही स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात स्वातंत्र्यदिनाचा सोहळा (Independence Day ceremony) उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. सकाळी ८:३० वाजता ध्वजारोहण करण्यात येणार आहे. वरिष्ठ लष्करी अधिकारी कर्नल नरेन्द्र नाथ सुरी ( निवृत्त) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. यानंतर महाराष्ट्र मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज पार्क भोवती पथसंचलन करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे ७७व्या स्वातंत्र्यदिन (Independence Day ceremony) सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कार्यवाह राजेंद्र वराडकर, सहकार्यवाह स्वप्नील सावरकर यांच्यासह सभासद व सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात महाराष्ट्र मिलिटरी स्कूल, तळवली, मुरबाड येथील विद्यार्थ्यांकडून ध्वजाला सलामी दिली जाईल. त्यानंतर या विद्यार्थ्यांकडून पथसंचलन करण्यात येणार आहे.
(हेही वाचा – Prithviraj Chavan : भाजपाकडून शरद पवारांना कृषी मंत्री आणि नीती आयोगाच्या अध्यक्षपदाची ऑफर – पृथ्वीराज चव्हाण)
७७ वा ध्वजारोहण सोहळा
वेळ : सकाळी ८:३० वाजता
स्थळ : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, दादर
रक्तदान शिबिराचे आयोजन
७७व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने (Independence Day ceremony) स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, टाटा हॉस्पिटल आणि मुंबई अल्ट्रा यांच्या संयुक्त विद्यमाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत रक्तदान करता येणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community