विदर्भात पावसाच्या हलक्या सरी

गेल्या आठवड्याभरापासून विदर्भात सुरु असलेल्या उष्णतेच्या लाटांची झळ आता कमी झाली आहे. विदर्भातील बहूतांश भागांत कमाल तापमान दोन अंशाने घटल्याचे मंगळवारी दिसून आले. ४६ अंशापुढे गेलेल्या चंद्रपूर, ब्रह्मपुरी आणि अकोल्यात मंगळवारी कमाल तापमान प्रत्येकी ४४.४ , ४४.२, ४४.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. मात्र विदर्भात दोन दिवस पावसाच्या हलकी सरी राहतील, असा अंदाज भारतीय वेधशाळेने व्यक्त केला आहे.

या ठिकाणी बरसला हलका पाऊस

मेघगर्जनेसह विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या विदर्भात कमाल तापमान अजूनही सरासरीरेक्षाही दोन अंशाने जास्त नोंदवले जात आहे. पावसाच्या हजेरीत कमाल तापमानात अजून थोडी घट होईल, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. आज गडचिरोली, अमरावती, वर्धा, ब्रह्मपुरी, नागपूरातील रामटेक या ठिकाणी हलका पाऊस झाला. उद्या, बुधवारी भंडारा, अमरावती, गडचिरोली आणि गोंदियात हलक्या पावसाची शक्यता नागपूर प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवली आहे.

(हेही वाचा – बाळासाहेबांनी घडवलेल्या ‘त्या’ इतिहासाची पुनरावृत्ती राज ठाकरे करणार, मनसेचा दावा)

मंगळवारी नोंदवलेले विदर्भातील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

अकोला – ४४.२
अमरावती – ४३.६
बुलडाणा – ४१.२
ब्रह्मपुरी – ४४.२
गडचिरोली – ४४.४
गोंदिया – ४१.४
नागपूर – ४३.५
वर्धा – ४४.५
वाशिम – ४२.५
यवतमाळ – ४३.५

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here