भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्त्रो’ ‘चांद्रयान-३’ या मोहीमेसाठी सज्ज झाला आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरुन शुक्रवार १४ जुलै रोजी दुपारी २.३५ वाजता ‘बाहूबली’ ‘चांद्रयान-३’ या रॉकेटचे प्रक्षेपण होईल. इतिहासाच्या पानावर एक नवा अध्याय लिहिण्यासाठी भारत आता सज्ज झाला आहे.
मोहीम शंभर टक्के यशस्वी होण्याची खात्री
‘चांद्रयान-३’ या रॉकेटचे हे सहावे उड्डाण असून, इस्त्रोला ही मोहीम शंभर टक्के यशस्वी होणार याची खात्री आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) चे अध्यक्ष एस सोमनाथ या मोहीमेबद्दल म्हणाले, “‘चांद्रयान-३’ ही अशी एक धाडसी मोहीम आहे ज्याचा उद्देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग यशस्वीपणे करणे आहे. त्यात सात उपकरणेदेखील आहेत. जर भारत या मोहीमेत यशस्वी झाला तर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणाऱ्या रशिया, अमेरिका आणि चीन नंतरचा चौथा देश बनणार आहे.” महत्वाची गोष्ट म्हणजे जर ‘चांद्रयान-३’ मोहीम यशस्वी झाली तर, चंद्राच्या पृष्ठभागावर भारताचा राष्ट्रध्वज दाखवणारा पहिला सेल्फी आपण पाहू शकणार आहोत.
(हेही वाचा – Cabinet Expansion : एकमत न झाल्याने मंत्रिमंडळ विस्तार रखडला?)
चंद्रावरची भारताची तिसरी मोहीम
‘चांद्रयान-३’ ही भारताची तिसरी मोहीम आहे. या मोहीमेत सुमारे चार लाख किलोमीटरच्या प्रवासात ३,९२१ किलो वजनाचा उपग्रह सोडण्यात येणार आहे. हे अपग्रेडेड ‘बाहुबली’ रॉकेट, ज्याला आता लॉन्च व्हेईकल मार्क ३ (LM-३) असे नाव देण्यात आले असून त्याचे वजन ६४२ टन आहे. हे विशाल रॉकेट ४३.५ मीटर उंच आहे, जे ७२ मीटर उंचीच्या कुतूबमिनारापेक्षाही अधिक उंचीचे आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community