प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशी जखमी; चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडली दुर्घटना

‘द कश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) फेम अभिनेत्री पल्लवी जोशी (Pallavi Joshi) या प्रसिद्ध अभिनेत्रीचा ‘द वॅक्सीन वाॅर’ ( The Vaccien War) या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अपघात झाला आहे. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान पल्लवी जोशी यांना दुखापत झाली आहे.

हैदराबादमध्ये (hyderabad) द वॅक्सिन वाॅर या चित्रपटाचे शूटिंग सुरु होते. या दरम्यान एका गाडीचे नियंत्रण सुटले आणि ती जाऊन पल्लवी जोशी यांना धडकली. मात्र, दुखापत होऊनही पल्लवी यांनी चित्रपटाचा तो शाॅट पूर्ण केला आणि नंतर त्यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, आता पल्लवी जोशी यांची तब्येत ठीक आहे. शुटिंगदरम्यानचा एक फोटोदेखील पल्लवी जोशी यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.

( हेही वाचा: २६ जानेवारीला दक्षिण आफ्रिकेतून भारतात येणार आणखी १२ चित्ते! )

 ‘द वॅक्सीन वाॅर’ स्वातंत्र्यदिनी प्रेक्षकांच्या भेटीला

द कश्मीर फाईल्स या चित्रपटाच्या प्रसिद्धीनंतर आत  दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री ‘द वॅक्सीन वाॅर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. त्यांनी या चित्रपटाचे एक पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरला विवेक यांनी कॅप्शन दिले आहे. ‘सादर करत आहोत, द वॅक्सीन वाॅर’, भारताने लढलेल्या युद्धाची एक अविश्वसनिय सत्य कथा’. हा चित्रपट 2023 रोजी स्वातंत्र्यदिनी प्रेक्षकांच्या भेटीला येईल. हा चित्रपट 11 भाषांमधून प्रदर्शित केला जाणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here