आता ‘द काश्मीर फाईल्स’ प्रदर्शित होणार ‘या’ चार भाषांमध्येही!

125

देशात सध्या प्रत्येकाच्या तोंडात एकाच चित्रपटाचे नाव आहे, तो चित्रपट म्हणजे ‘द काश्मीर फाईल्स’. या चित्रपटाची जोरदार चर्चा असली तरी यावरून वाद देखील निर्माण झाले आहेत. दरम्यान, विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित हा चित्रपट पहिल्याच आठवड्यात 100 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यांवर घेतलं असलं तरी यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. मात्र आता ‘द काश्मीर फाईल्स’ संबंधित आणखी एक आनंदाची बातमी असल्याचे सांगितले जात आहे.

चित्रपट प्रादेशिक भाषांमध्येही होणार डब

‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला. 1990 मध्ये नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. काश्मीर खोऱ्यातील लाखो हिंदूंना स्वतःचे घर सोडावे लागले होते. यामध्ये अनुपम खेर आणि मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत इतरही काही नामवंत कलाकारांच्या भूमिका असून हा चित्रपट आता प्रादेशिक भाषांमध्येही डब केला जाणार आहे.

या चार भाषांमध्येही होणार प्रदर्शित

एका खासगी वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटाते यश पाहता निर्मात्यांनी हा चित्रपट आणखी चार प्रादेशिक भाषांमध्ये डब करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, हा चित्रपट आता तेलुगु, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत डब केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. ज्या प्रेक्षकांना हा चित्रपट हिंदी भाषेत असल्याने पाहता येत नाही, अशा प्रेक्षकांसाठी ही गुडन्यूज आहे. यामुळे आता हा चित्रपट दक्षिण भारतीय प्रेक्षकांनाही पाहता येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.