द कश्मीर फाइल्स: IFFI च्या लोकांना कसे दिसणार सत्य?

158

इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) चे ज्युरी प्रमुख नादव लॅपिड यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाबाबत केलेले एक लाजीरवाणे विधान समोर आले आहे. इफ्फीच्या ज्युरी प्रमुखांनी या चित्रपटाला प्रोपगंडा बेस्ड आणि वल्गर म्हटले आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, या लोकांना कश्मीरी पंडितांवर झालेल्या अत्याचारांशी काहीही घेणेदेणे नाही. त्यांना फक्त नृत्य आणि अश्लीलता असलेले आजचे चित्रपट आवडतात. ज्या चित्रपटांमध्ये अभिनेत्री तोकडे कपडे घालून नाचतात. ज्या चित्रपटांमध्ये हिंदू देवी-देवतांचा अपमान केला जातो. त्यांना अशा प्रकारचे सिनेमे खूप आवडतात. पण ज्या चित्रपटात वास्तव दाखवण्यात आले आहे, ज्या चित्रपटात दहशतवाद्यांकडून हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविषयी सत्य दाखवण्यात आले आहे, या लोकांना असे चित्रपट अजिबात आवडत नाहीत.

या चित्रपटाला प्रोपगंडा म्हणणे योग्य आहे का?

द कश्मीर फाइल्स हा प्रत्येक भारतीयाला विचार करायला लावणारा चित्रपट आहे. ज्यांनी हा चित्रपट पाहिला त्यांना आपल्या डोळ्यातील अश्रू लपवता आले नाहीत. अशा चित्रपटाला इफ्फीचे ज्युरी प्रमुख नादव लॅपिड यांनी प्रोपगंडा चित्रपट म्हणणे कितपत योग्य आहे?

द कश्मीर फाईल्स हा काश्मिरी पंडितांवरील अत्याचाराचे वर्णन करणारा चित्रपट आहे. खरं तर हा एक सत्य सांगणारा चित्रपट आहे. 90 च्या दशकात काश्मिरी पंडितांवर कसे अत्याचार झाले, त्यांना घरे सोडण्यास भाग पाडले गेले, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. त्यांना त्यांच्याच भूमीतून बेदखल करण्यात आले. त्यांना अपमानित जीवन जगावे लागले. सर्व काही लुटले गेले, पंडितांचे संसार उद्ध्वस्त झाले. त्यांना काफिर ठरवून त्यांच्याच घरातून हकलून देण्यात आले. स्त्रीयांवर बलात्कार केले गेले. त्यावेळेचे हे वास्तव या चित्रपटातून दाखवण्यात आले आहे.

या मंचावरुन करण्यात आली टीका

28 नोव्हेंबरला गोव्यात आयोजित 53 व्या भारतीय चित्रपट महोत्सवाचा शेवटचा दिवस होता. दरम्यान, ज्युरी प्रमुख आणि इस्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांनी द काश्मीर फाइल्सवर टीका केली. यावेळी ते म्हणाले की, या फिल्म फेस्टिव्हलमध्ये अशा प्रकारचा चित्रपट दाखवण्यात आल्याने आपण सर्व व्यथित झालो आहोत. हा चित्रपट अश्लील आणि अपप्रचार करणारा आहे.

इस्रायलच्या राजदूताने हे विधान लज्जास्पद असल्याचे म्हटले

इस्रायलचे भारतातील राजदूत नूर गिलन यांनी याप्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे. नाओर गिलन यांनी इफ्फीचे ज्युरी प्रमुख नदाव लॅपिड यांचे विधान लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, भारतीय संस्कृतीत पाहुण्याला देव म्हटले जाते. तुम्ही भारताच्या विश्वासाचा आणि सन्मानाचा गैरवापर केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.