मी स्वत: हिंदुंची हत्या पाहिली आहे, मुस्लिमांनी माफी मागावी!

125

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाबाबत सध्या देशात जोरदार चर्चा सुरु आहे. देशातील एक समूह या चित्रपटातून काश्मिरी पंडितांच्या हत्याकांडाचे सत्य समोर आल्याचं म्हटलं आहे, तर काही जण या चित्रपटाच्या माध्यमातून इस्लामोफोबियाला प्रोत्साहन देण्याचाही आरोप करत आहेत. पण या सगळ्यात जावेद बेग नावाच्या काश्मिरी लेखकाने म्हटले आहे की, तो काळ खूप भयावह होता, ज्यात अनेक गुन्हे घडले होते आणि तोही त्याचा साक्षीदार आहे. त्यामुळे मुस्लिमांनी माफी मागावी, असे आवाहनही बेग यांनी केले आहे.

 पोस्ट होतेय व्हायरल

जावेद बेग यांनी एक पोस्ट शेअर करत लिहिले की, त्यांच्या पूर्वजांनी ज्या चुका केल्या आहेत, आजच्या तरुणांनी ती चूक मान्य करावी. काश्मिरी पंडितांना मारणारे आमच्याच वस्तीतील आणि आमच्याच घरातील लोक असल्याचे जावेद बेग म्हणाले. तसेच काश्मिरी पंडितही गैर नाहीत. काश्मिरी पंडित हे आमचे रक्त आणि आमचा समाज आहे, असही बेग पुढे म्हणाले.

तरीही सत्य बदललं जाऊ शकत नाही

बेग यांनी त्यांच्या विचारांचा एक व्हिडिओ शेअर केला. एका काश्मिरी वृत्तवाहिनीशी बोलतानाचा हा व्हिडीओ आहे. यात त्यांनी काश्मिरी पंडित गिरीजा टिकू यांच्या हत्येचा आणि इतर लाखो काश्मिरी पंडितांना जबरदस्तीने स्थलांतरित व्हावे लागले, या दुर्दैवी शोकांतिकेवर त्यांचे मत व्यक्त केले. काश्मिरी मुस्लिमांनी स्वातंत्र्याच्या नावाखाली हातात शस्त्रे घेतली, हा अपप्रचार नसून वास्तव असल्याचेही बेग यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. कोणीही सांगितले नाही, तरी सत्य हे नेहमीच सत्य असते आणि खोटं कितीही ओरडून सांगितलं, तरी ते सत्य होत नसल्याचही त्यांनी स्पष्ट केलं.

( हेही वाचा … तर पुन्हा परीक्षेला बसता येणार नाही! )

चित्रपटाचे कौतुक

काश्मीर फाइल्स हा चित्रपट अनेक राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आला आहे. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.