‘शालिनी’…नही ‘फातिमा’… परंतु शालिनी ही हिंदू मुलगी फातिमा कशी झाली? केरळमधील हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांना कसे मुस्लिम बनवण्यात आले. या घटनेवर “द केरला स्टोरी” (The Kerala Story) हा चित्रपट आधारलेला आहे. सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.
( हेही वाचा : उद्धव ठाकरेंनी राऊतांचे डोके तपासून घ्यायला पाहिजे – अब्दुल सत्तार)
“द केरला स्टोरी” (The Kerala Story) या चित्रपटाचा थरारक ट्रेलर पाहून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका राज्यातून हजारो मुली बेपत्ता होणे हा संबंधित राज्याला इस्लामिक स्टेट बनवण्याचा ग्लोबल अजेंडा आहे असा उल्लेख चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये करण्यात आला आहे. हा ट्रेलर सोशल मीडियावर नंबर १ ला ट्रेंड होत असतानाचं काही डाव्या विचारसरणीच्या लोकांनी यावर व्यक्त होण्यास सुरूवात केली आहे.
केरला स्टोरी (The Kerala Story) जगासाठी वास्तवतेचा आरसा
सोशल मीडियावर काही लोकांनी या चित्रपटाला “अजेंडा” असे संबोधल्यावर नेटकऱ्यांनी अशा लोकांचा चांगलाच समाचार घ्यायला सुरूवात केली आहे. “This Will Be An Eye Opener”, “हा केवळ चित्रपट नाहीतर जगासाठी वास्तवतेचा आरसा आहे”, काश्मीर फाईल्स, द केरला स्टोरी या चित्रपटांना काल्पनिक ठरवून पठाण आणि टायगर जिंदा है यामध्ये पाकिस्तान ISI भारतीय RAW ला मदत करतेय असे दाखवून या बॉलिवूड चित्रपटांना वस्तूनिष्ठ ठरवणं हा डाव आहे. असे म्हणत नेटकऱ्यांनी व्यक्त होण्यास सुरूवात केली आहे.
काल्पनिक पठाणला वस्तूनिष्ठ ठरवणं योग्य आहे का?
जानेवारी २०२३ मध्ये रिलीझ झालेल्या पठाण चित्रपटात ISI एजेंटचे RAW एजंटसोबत प्रेमसंबंध दाखवण्यात आले असून यामध्ये दोन्ही संस्था एकत्र काम करत असल्याचे दाखवले आहे. परंतु या बॉलिवूड चित्रपटात दाखवल्यामुळे ISI आणि RAW या दोन्ही संस्था प्रत्यक्षात केव्हाच एकत्र काम करू शकत नाही हे खरे वास्तव असताना पठाण, टायगर जिंदा है या चित्रपटांचे समर्थन करणे कितपत योग्य आहे असा सवाल केला जात आहे.
या दोन्ही चित्रपटांचा उदोउदो करून काश्मीर फाईल्स आणि केरला स्टोरी (The Kerala Story) या वास्तववादी घटनांना काल्पनिक ठरवणे हा डाव्या विचारसरणीच्या लोकांचा नवा डाव आहे असा आरोप हिंदुत्ववादी तसेच काही प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या लोकांकडून करण्यात येत आहे.
The Kashmir Files was propaganda,
Now Kerala story is propaganda,
Only "Pathan" & "Tiger Zinda hai" showed reality where ISI helps Raw, how cute!!
— ThtKashmiriGuy (@ThtKashmiriGuy) April 27, 2023
सत्यपरिस्थिती दाबण्याचा डाव्यांचा अजेंडा
काश्मीर फाईल्सनंतर आता केरला स्टोरी हा एक अजेंडा किंवा प्रोपोगंडाचा एक भाग आहे. असा आरोप डाव्यांकडून केला जात असून अशी घटना केरळमध्ये कधी घडलीच नव्हती असेही बोलले जात आहे. परंतु यासंदर्भात द केरला स्टोरी या चित्रपटाचे दिग्दर्शक विपुल शाह यांनी एका मुलाखतीदरम्यान स्पष्टीकरण दिले आहे.
“या चित्रपटाची कथा तीन मुलींच्या जीवनावर आधारलेली खरी घटना आहे. या तीन मुलींसोबत जर हे खरोखर घडले आहे, तर यामध्ये अजेंडाचा संबंध काय? हा त्या लोकांचा अजेंडा नक्कीच असू शकतो जे लोक ही घटना, सत्यपरिस्थिती दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. हा खूप मोठा डाव असून आम्ही त्यावर लक्ष देणार नाही कारण, या चित्रपटाची निर्मिती करताना आम्ही शेकडो मुलींना भेटून रिसर्च केला होता. त्या लाखो मुली मन्युपुलेटिव्ह कन्वर्जनच्या शिकार झाल्या होत्या. त्यामुळे ही (The Kerala Story) फिल्म खोटी कशी असू शकते? आम्ही नेहमीच खऱ्याच्या बाजूने उभे आहोत.” असे शाह म्हणाले.
हेही पहा :
Join Our WhatsApp Community