झोपेच्या जागेवरून ठाण्याच्या कारागृहात कायद्यामध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या हाणामारीत एक कैदी जखमी झाला आहे. याप्रकरणी ठाणे नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुरूंगातील सहका-यांना बोलावून केली मारहाण
जितेंद्र वाल्मिकी असे जखमी झालेल्या कैद्याचे नाव आहे. जितेंद्र याला डोंबिवलीच्या टिळक नगर पोलिसांनी एका खुनाच्या गुन्ह्यात गेल्या वर्षी अटक केली होती. या गुन्ह्यात जितेंद्र हा ठाणे मध्यवर्ती कारागृहात कैदेत आहे. कारागृहातील मुख्य सर्कल बॅरेक क्रमांक ३ या ठिकाणी जितेंद्रला बंदी म्हणून ठेवण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी जितेंद्र हा बॅरेकमध्ये अंथरून टाकून झोपायला गेला असता त्याच बॅरेकमध्ये बंदी असलेला झोरुद्दीन जाकीर हुसेन हा त्याच्या शेजारी झोपण्यासाठी आला. त्याने जितेंद्रला अंथरून कमी कर मला जागा होत नाही, असे ओरडून सांगितले. मात्र जितेंद्रने त्याला माझे अंथरुन बरोबर आहे तू बाजूला सरकून झोप असे सांगितले असता झोरुद्दीन जाकीर हुसेन याने त्याला शिवीगाळ करू लागला. काही वेळ दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरु होता, मात्र झोरुद्दीन जाकीर हुसेन याने आपल्या सहकार्यांना बोलवून जितेंद्रला लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केले. दरम्यान इतर कैद्यांनी तुरुंग रक्षकाला माहिती देताच तुरुंग रक्षकांनी जखमी जितेंद्रला उचारासाठी कारागृहातील वैद्यकीय विभागात दाखल केले. या मारहाणीत जितेंद्रचे दात पडले आहे. याप्रकरणी ठाणे नगर पोलिस ठाण्यात झोरुद्दीन जाकीर हुसेन आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.
(हेही वाचा नांदेडमध्ये अंमली पदार्थाचा कारखाना उद्ध्वस्त, एनसीबीची कारवाई)
Join Our WhatsApp Community