अमेरिकेतील येल येथील पर्यावरण कायदा आणि धोरणासाठीचे केंद्र, आंतरराष्ट्रीय पृथ्वी विज्ञान माहिती नेटवर्क केंद्र आणि कोलंबिया विद्यापीठाने यादी नुकतीच जाहीर झाली आहे. या यादीनुसार भारत तळाला आहे. त्यामुळे नुकत्याच झालेल्या जागितक पर्यावरण दिनाच्या पार्श्नभूमीवर ही चिंता वाढवणारी बातमी आहे. याच यादीत डेन्मार्क प्रथम क्रमांकावर, त्यानंतर ब्रिटन, फिनलंड हे अनुक्रमे दुस-या आणि तिस-या क्रमांकावर आहेत.
( हेही वाचा: स्मार्ट कार्ड नसेल तर एसटीचे फुल तिकीट काढावे लागणार )
देश पहिल्यांदाच यादीत शेवटी
भारतासह या यादीत तळात म्यानमार, पाकिस्तान आदी देशांनी शाश्वत विकासापेक्षा आर्थिक विकासाला महत्त्व दिले आहे. त्याचप्रमाणे, नागरी अशांतता आणि इतर संकटांचाही हे देश सामना करत आहेत. भारतातील हवेचा दर्जा धोकादायक बनत असून वेगाने वाढणा-या हरितगृह वायू उत्सर्जनामुळे देश पहिल्यांदाच यादीत शेवटचा क्रमांवर गेल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
चीन 28.4 गुणांसाठी 161व्या क्रमांकावर आहे. भारत व चीन हे दोन्ही देश 2050 पर्यंत सर्वाधिक वायू उत्सर्जन करणारे देश बनतील, असा अंदाज या अहवालात वर्तवण्यात आला आहे.