पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, पुणे रेल्वे स्थानकाचा भार होणार कमी! कारण…

112

पुण्यातील रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे पुण्यातील शिवाजीनगर स्टेशनवर लोकलसाठी नवी लाईन बांधली जाणार असून फलाट एकच्या मागील बाजूस ही लाईन टाकण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या कामाला मंजुरी मिळाली असून आता लवकरच प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे.

पुणे स्टेशनवरून सुटणाऱ्या लोकल होणार कमी

मिळालेल्या माहितीनुसार, ३०० मीटर लांबीची ही लाईन असणार असून यासाठी किमान १ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या लाईनसाठी २ फूट खोल खड्डे खणले आहेत. ही लाईन पूर्ण होताच शिवाजीनगर स्टेशनवरून लोकलची संख्या वाढवली जाणार आहे. तसेच शिवाजीनगर हे लोकलसाठी टर्मिनल स्टेशन देखील होणार आहे. या स्थानकावरून लोकल सुटणार असून येथेच थांबणार आहे. यामुळे पुणे स्टेशनवरून सुटणाऱ्या लोकलची संख्या कमी होणार आहे.

(हेही वाचा – Indian Railway Concession: रेल्वे प्रवास होणार स्वस्त आणि सुखकर! रेल्वे मंत्रालयाने म्हटले….)

शिवाजीनगर स्टेशनवरून किमान १० ते १२ लोकल सुटणार

दरम्यान, शिवाजी नगर लोकल रेल्वेसाठी नवी लाईन तयार केल्याने पुणे स्थानकाचा भार कमी होण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे. तर हडपसर टर्मिनल, खडकी टर्मिनल यासह शिवाजीनगर स्टेशनवरची ईएमयू लोकल लाईनदेखील याचाच भाग आहे. नव्या लाईनवर लोकल थांबून राहील. त्यामुळे एक प्रकारची तिचा स्टॅब्लिंग लाईनसारखा त्याचा वापर होईल. परिणामी, एक फलाट मोकळा राहील. यासह पुणे स्टेशनवरचा लोकलचा भार कमी करण्यासाठी काही लोकल आता पुणेऐवजी शिवाजीनगर स्टेशनवरून सुटणार आहे. येत्या काळात शिवाजीनगर स्टेशनवरून किमान १० ते १२ लोकल सुटणार असल्याचेही सांगितले जात आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.