समृद्धी महामार्गावरील नागपूर-शिर्डी बस सेवा स्थगित; ‘हे’ आहे कारण

समृद्धी महामार्गावर सुरु झालेली पहिली बससेवा स्थगित करण्यात आली आहे. अपेक्षेप्रमाणे डिझेलचे पैसे निघतील एवढेही प्रवासी मिळत नसल्यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने समृद्धी महामार्गावर धावणा-या नागपूर- शिर्डी बस सेवेला स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने डिसेंबरपासून नागपूर ते शिर्डी अशी समृद्धी महामार्गावरील पहिली एसटी बस सेवा सुरु केली होती. फक्त तेराशे रुपये भाडे असलेल्या या सेवेच्या माध्यमातून आठ तासांत शिर्डीला पोहोचला येत असल्याने या बस सेवेला मोठा प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, अवघ्या तीन महिन्यांतच समृद्धी महामार्गावरील पहिली एसटी बस सेवा बंद करण्याची नामुष्की एसटीवर ओढावली आहे.

( हेही वाचा: येत्या १ एप्रिल २०२३ पासून धूळ नियंत्रण उपाययोजनांची होणार सक्त अंमलबजावणी; उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई )

समृद्धी महामार्गावरील पहिली एसटी बस सेवा बंद

  • समृद्धी महामार्गावरुन सुरु झालेली बस सेवा स्थगित
  • समृद्धीवरुन धावणारी नागपूर-शिर्डी बस सेवा बंद करा, अशा आशयाचे नागपूर विभाग नियंत्रकाचे एसटी व्यवस्थापनाला पत्र
  • उद्धाटनानंतर डिसेंबर महिन्यात 41 टक्के प्रवासी मिळाले होते.
  • फेब्रुवारी महिन्यात अनेक दिवस एकही प्रवासी नसल्याने डिझेलचे पैसेही निघाले नसल्याची माहिती

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here