अशी मोलकरीण नको रे बाबा! अखेर केली अटक

109

श्रीमंत लोकांचा विश्वास संपादन करत आशा उर्फ नर्मदा खान ही कामाच्या बहाण्याने घरात शिरली आणि नंतर घरातून तब्बल 91 तोळे सोने चोरले. उल्हासनगरच्या गुन्हे शाखा पथकाने आशा हिला 91 तोळे सोन्याचे दागिने चोरी प्रकरणी मुलुंडमधून अटक केली आहे. पोलीस तपासात या आरोपी महिले बद्दल धक्कादायक माहिती समोर आली असून मुंबई आणि आसपासच्या शहरांमध्ये तिने अशाच प्रकारे चोऱ्या केल्या आहेत. तिच्यावर 12 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

अखेर अटक

23 ऑक्टोबरला उल्हासनगरमधील भारत पॅलेस येथे राहणाऱ्या राम जेतानंद तनवाणी यांच्या घरी चोरी झाली होती. कपाटातील सर्व दागिने घेऊन आशा खान फरार झाल्या होत्या. ज्याचे वजन 91 तोळे असल्याचे सांगण्यात आले होते. आशा खानच्या शोधात गुन्हे शाखा पथक उत्तर प्रदेशातील बुलंदशहर, गुजरातमधील अहमदाबाद येथे गेले मात्र अखेर पोलिसांच्या पथकाने तिला मुलुंड येथून अटक केली.

( हेही वाचा : भटक्या श्वानांना पकडणारी वाहनेच कालबाह्य! )

विविध पोलीस ठाण्यात 12 गुन्हे

अटक केल्यावर आशा खान यांच्याकडून 25 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीने चोरीची कबुलीही दिली आहे. महिलेवर विविध पोलीस ठाण्यात 12 गुन्हे दाखल आहेत. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगळे यांनी दिली. कुटुंब घराबाहेर गेले असताना, तिने आपल्याकडील चावीने दरवाजा उघडून सोने चोरी केले होते. त्यानंतर ती पसार झाली होती. असेही त्यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.