‘आधार कार्ड’ संंबंधी सरकारने केला ‘हा’ नवा नियम

155

आधार कार्ड संबंधी नियमांमध्ये केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. आधार क्रमांक प्राप्त झाल्यानंतर 10 वर्षांनी किमान एकदा संबंधित कागदपत्रे अपडेट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. इलेक्टाॅनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने याबाबत गॅझेट अधिसूचना जारी केली आहे. आधारची माहिती दर 10 वर्षांनी किमान एकदा अपडेट करावी लागणार आहे.

फसवणुकीचे प्रकार टळतील

सरकारच्या निर्णयामुळे इतर योजनांचा लाभ घेणे सोपे होणार आहे. तसेच, फसवणुकीचे प्रकारही कमी करता येतील, असे सरकारचे म्हणणे आहे.

( हेही वाचा: पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारताला डीवचण्यासाठी ट्विट केलं, अन् तेही दुसऱ्याचं चोरून? )

कोणती माहिती अपडेट करावी लागणार?

  • आधार क्रमांक प्राप्त झाल्यानंतर ज्यांनी एकदाही माहिती अपडेट केलेली नाही, त्यांना ओळख व रहिवासाची माहिती अपडेट करावी लागणार आहे.
  • UIDAI ने My Aadhar Portal आणि अॅपमध्ये बदल केले आहेत. या पोर्टलवर अपडेट आधार ही लिंक सुरु करण्यात आली आहे. तेथून आवश्यक कागदपत्रे जोडून माहिती अपडेट करता येईल.
  • कोणत्याही आधार केंद्रावर जाऊनदेखील माहिती अपडेट करता येईल. नाव आणि फोटो असलेले ओळखीचे प्रमाणपत्र तसेच निवासाचा पुरावा दर्शवणारी कागदपत्रे जोडून आधार अपडेट करता येईल.
  • देशात आतापर्यंत 134 कोटी आधार क्रमांक जारी करण्यात आलेले आहेत. किती जणांना आधार अपडेट करावा लागेल, याबाबत नेमकी माहिती सरकारने दिलेली नाही.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.