मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी एसटी विलिनीकरणाबाबतची सुनावणी पुढे ढकलली आहे. ही सुनावणी आता २२ डिसेंबर रोजी होणार असल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी असे सांगितले की, मुंबई उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर आज सांगितलं की, परिवनहनमंत्री हे वारंवार अल्टिमेटम दिल्याचे सांगतात. ५४ जणांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे. त्यामुळे कर्मचारी नैराश्यात आहेत, ते काम करू शकत नाहीत. तसेच, आज सरकारचा आमचा आणि ज्या संघटना होत्या त्यांचा युक्तीवाद झाला आहे.
२२ डिसेंबरला दुपारी अडीच वाजता होणार सुनावणी
पुढे ते असेही म्हणाले की, आज आम्ही न्यायालायासमोर ४८ हजार कष्टकऱ्यांचं लिखित प्रतिज्ञापत्र करून ते सादर केलं. न्यायालयाने सर्व बाजू ऐकून घेतल्या. त्यानंतर आता २२ डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजता यावर सुनावणी होणार आहे. यावेळी सदावर्ते यांनी असे सांगितले की, आम्ही आमचा लढा असाच सुरू ठेवणार आहोत. यासह कर्मचाऱ्यांना जाणूनबुजून त्रास दिला जातोय. कर्मचाऱ्यांचे बडतर्फ, सेवासमाप्ती, निलंबन केलं जात आहे, असा आरोपही यावेळी सदावर्ते यांनी केला आहे.
(हेही वाचा- ‘लालपरी’च्या सेवेतून ११ कर्मचारी बडतर्फ, २५७ जणांना ‘कारणे दाखवा’ नोटीस)
विलिनीकरणच्या मागणीवर कर्मचारी ठाम
दरम्यान, एसटी महामंडळाचे विलिनीकरण करण्याच्या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. मात्र दुसरीकडे महामंडळाकडून आतापर्यंत २५७ कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्याला उत्तर न देणाऱ्या ११ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली.
Join Our WhatsApp Community