मुंबई विमानतळाच्या आसपासच्या इमारती तातडीने पाडा; उच्च न्यायालयाचा आदेश

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आसपास असलेल्या टोलेजंग इमारतींबाबत उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. विमानतळाच्या आजूबाजूला असलेल्या 48 इमारती पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने डीजीसीएच्या आदेशाचे तातडीने पालन करण्यास सांगितले आहे. ANI वृत्तसंस्थेने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

मर्यादेपेक्षा जास्त उंची असणा-या इमारतींचे भाग पाडा

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ असलेल्या इमारतींबाबत हे आदेश आहेत. ज्या भागांची उंची मर्यादेपेक्षा जास्त आहे, ते भाग पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील 48 उंच इमारतींचे भाग तातडीने पाडण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, ठराविक उंचीपेक्षा जास्त बांधकाम केलेले भाग पाडण्यात येणार आहेत. मुख्य न्यायमू्र्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने ही जबाबदारी बृहन्मुंबई महानगरपालिकेवर ठकवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल जिल्हाधिका-यांवर ताशेरे ओढले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here