पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी देणारा निघाला मनोरुग्ण!

141

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याच्या धमकीचा मेल करणाऱ्याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने शोधून काढले आहे. ताब्यात घेण्यात आलेली व्यक्ती इंजिनियर असून तो मनोरुग्ण असल्यामुळे त्याला समज देऊन सोडून देण्यात आले आहे.

( हेही वाचा : चाईल्ड पोर्नोग्राफी करणा-या तरुणाचा पोलिसांनी असा लावला छडा! )

मेलवर दहशतवादी संघटनेचा उल्लेख

राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए)च्या मुंबई कार्यालयात काही दिवसांपूर्वी एक अज्ञात व्यक्तीने ई मेल केला होता. या मेलमध्ये त्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती, त्याचबरोबर त्याने आम्ही २० स्लीपर सेल तयार केले असून २० किलो आरडीक्सचा वापर केला जाणार आहे. गंभीर बाब म्हणजे धमकी देणाऱ्याने दहशतवादी संघटनेचा उल्लेख मेल वर केला होता.

पोलिसांनी घेतले ताब्यात

ही बाब गंभीर असल्यामुळे एनआयएने मुंबई सह इतर तपास यंत्रणेला सतर्क करून धमकीचे मेल पाठविण्यात आले. धमकीचा मेल करणाऱ्याचा शोध घेण्यात येत असताना मुंबई गुन्हे शाखेने मेल करणाऱ्याला शोधून ताब्यात घेतले होते, ताब्यात घेण्यात आलेली व्यक्ती परराज्यातील असून मनोरुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. पेशाने इंजिनियर असणाऱ्या या व्यक्तीला मुंबई गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन त्याचा जबाब नोंदवून त्याला समन्स देऊन सोडून देण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.