राज्यातील जनता कशाने झालीये हैराण?

152

राज्यात उत्तर कोकणातील अंतर्गत भागांत आणि विदर्भात उष्णतेची लाट रंगपंचमीच्या दिवशीही घामटवणारी होती. त्यामुळे धूळवड साजरी करणा-यांना सूर्याच्या तप्त किरणांतच होळीचा आनंद लुटावा लागला. कोरोनानंतरच्या दोन वर्षानंतर धूळवड साजरी करताना उष्णतेचा दाट शरीर भाजून काढतो की का, असा अनुभव कित्येकांना आला असून राज्यातील पारा चाळीशीपार गेल्याने जनता हैराण झाली आहे.

गेले काही दिवस कर्जतमध्ये राज्यातील सर्वात जास्त कमाल तापमानाची नोंद होत असताना शुक्रवारी मात्र अकोल्यातील कमाल तापमानाने पहिला क्रमांक गाठला. अकोल्यातील कमाल तापमान ४२.७ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले. अकोल्याखालोखाल जळगावमधील कमाल तापमान दुस-या स्थानावर होते. जळगावमधील कमाल तापमानाने ४२.६ अंश सेल्सिअसची उंची गाठली दोन्ही ठिकाणी सरासरीच्या चार अंश जास्त कमाल तापमानाची नोंद होती. तिस-या स्थानावर अमरावती आणि वर्ध्यातील कमाल तापमान होते. दोन्ही ठिकाणी ४१.४ अंश सेल्सिअसची नोंद झाल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिली.

(हेही वाचा – .वेळासची किनारपट्टी इवल्याश्या पाऊलखुणांनी बहरली…)

मुंबईतील तापमान कसे असेल?

मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने मुंबईसाठी उष्णतेची लाट सरल्याचे दोन दिवसांच्या अंदाजपत्रकातून जाहीर केले. मुंबईत आता केवळ आकाश निरभ्र राहील. कमाल तापमान ३६ तर किमान २३ अंश सेल्सिअसपर्यंत राहील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. मात्र मुंबईतील अंतर्गत भागांत उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अद्यापही कायम आहे. पवई आणि मुलुंड येथे कमाल तापमान सलग चौथ्या दिवशीही चाळीस अंशापर्यंत आढळले. शुक्रवारच्या नोंदीनुसार, पवई आणि मुलुंडमध्ये कमाल तापमान ४०.२ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले गेले. इतरत्र ठिकाणी आता तापमान ४० अंशाखाली उतरले आहे.

चाळीस अंशापुढे गेलेले जिल्हे – कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

अकोला – ४२.७, जळगाव – ४२.६, अमरावती, कर्जत – ४१.९,वर्धा ४१.४, परभणी – ४१.२, सोलापूर – ४१.६

चाळीस अंशापर्यंत कमाल तापमानाची नोंद झालेले जिल्हे -कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

मालेगाव – ४०.८, सांगली – ४०.४, औरंगाबाद – ४०, नांदेड – ४०, ब्रह्मपुरी – ४०.४, नागपूर – ४०, ठाणे ४०.२

खासगी हवामान अभ्यासकांच्या नोंदीतील चाळीस आणि त्यापुढील कमाल तापमानाची नोंद – कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

मुंब्रा – ४०.३, पनवेल, तळोजा – ४०.६, डोंबिवली आणि उल्हासनगर – ४०.८, बदलापूर – ४०.८, कल्याण आणि भिवंडी – ४१, मणोर- ४१

मुंबईतील इतर ठिकाणांतील कमाल तापमानाची नोंद (अंश सेल्सिअसमध्ये)

कुलाबा – ३२.६, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – ३५.६, माटुंगा – ३६.८, सांताक्रूझ – ३६.९, सायन- ३७.२, राममंदिर – ३७.९, चेंबूर – ३८, घाटकोपर ३९.१

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.