मुख्यमंत्री सहायता निधीला महापालिका बँकेची १५ लाखांची देणगी

117

मुंबई महापालिका कर्मचा-यांच्या`दि म्युनिसिपल को.ऑप.बँक लिमिटेड, मुंबई` बँकेद्वारे मुख्यमंत्री सहायता निधीला रुपये १५ लाखांची देणगी देण्यात येत आहे. या अनुषंगाने बँकेच्या संचालक मंडळाद्वारे रुपये १५ लाखांची ‘पे ऑर्डर’ सोमवारी महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना सुपूर्द  केली. याप्रसंगी बँकेचे कार्याध्यक्ष तथा उप आयुक्त विश्वास शंकरवार, उप कार्याध्यक्ष तथा उप आयुक्त रमाकांत बिरादार यांच्यासह बँकेच्या संचालक मंडळातील मान्यवर सदस्य आणि संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

BMC 2

अद्ययावत सुविधा

महापालिका कर्मचा-यांच्या या सहकारी बँकेद्वारे ऑनलाईन बँकींग, कोअर बँकींग, आर.टी.जी.एस., एन.इ.एफ.टी., पॉस इत्यादी सुविधा देखील ग्राहकांना देण्यात येतात. ही बँक रुपे कार्डसची सभासद असून बँकेचे मुंबई व उपनगरात विविध ठिकाणी स्वतःची ए.टी.एम. केंद्रे आहेत. बँकेने मोबाईल पेमेंट सेवा देखील सुरू केली आहे. तसेच या बँकेने एखाद्या खासगी बँकेसारखीच अद्ययावत टेक्नोलॉजीवर आधारित बँकींग सेवा आपल्या ग्राहकांना उपलब्ध करुन दिली असल्याचे बँकेचे महाव्यवस्थापक विनोद रावदका यांनी या निमित्ताने सांगितले आहे. तसेच उत्कृष्ट नियोजन आणि कर्ज वसुलीसाठी केलेला सततचा पाठपुरावा यामुळे ग्रॉस एन.पी.ए. चे प्रमाण देखील अत्यंत कमी असल्याचेही रावदका यांनी या निमित्ताने आवर्जून नमूद केले आहे.

( हेही वाचा : कोस्टल रोडच्या कामात पालिकेकडून बनावाबनवी, मुंबईत चाललं काय?; शेलारांचा सवाल )

बँकेचे ८० हजारांपेक्षा अधिक सभासद 

`बँकिंग फ्रंटीअर्स’ यासारख्या विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आलेली बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचा-यांची दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लि. ही बँक महाराष्ट्रातील सहकारी बँकांमध्ये कर्मचारी गटातील सर्वांत मोठ्या बँकांपैकी एक आहे. या बँकेचे सुमारे ८० हजारांपेक्षा अधिक सभासद असून सुमारे १० हजार इतके नामधारी सभासद आहेत. ही बँक महानगरपालिकेच्या कर्मचा-यांच्या सर्वागीण आर्थिक गरजा भागविण्यासाठी कार्यरत आहे. या बँकेद्वारे महापालिका कर्मचाऱ्यांना कर्ज सुविधा, तर नागरिकांना विविध स्तरीय बँकींग सुविधा अत्यंत उत्तमरित्या देण्यात येतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.