दररोज तंत्रज्ञान बदलत आहे. दरदिवशी आपल्याला नवनवीन बदल तंत्रज्ञानामध्ये पाहायला मिळतात. आपले जीवन तंत्रज्ञानाशी जोडलेले आहे. जसजसे तंत्रज्ञान बदलत जाते तसतसे आपल्या आयुष्यातही बदल घडून येत असतात. हल्ली AI म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचं वारं सगळीकडे जोराने वाहताना दिसतंय. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या माध्यमातून कित्येक वेगवेगळ्या क्षेत्रातली आपली कितीतरी कामं सोपी झालेली आहेत. एआय चॅटबॉट चॅटजीपीटी हे नाव कोणालाही अनोळखी राहिलेले नाही. जगभरातल्या विभिन्न कंपन्यांनी याचा वापरही सुरू केला आहे.
या चॅटजीपीटीच्या नावामध्ये बदल करून भारतातील एका नागरिकाने आपली क्रिएटिव्हिटी चांगल्या पद्धतीने लोकांच्या समोर आणली आहे. त्याच्या या क्रिएटिव्हिटीचं लोक खूप कौतुक करत आहेत. आपल्या दुकानाचं नाव वेगळं असायला हवं असं सगळ्यांनाच वाटतं. त्यासाठी लोक अनेक जगावेगळी चित्रविचित्र नावं ठेवत असतात. पण या व्यक्तीने आपल्या चहाच्या दुकानाचं जे नाव ठेवलं आहे त्याचं लोक खूप कौतुक करत आहेत.
(हेही वाचा – मोदी सरकारच्या कामांची माहिती भाजपा कार्यकर्त्यांनी घरोघरी पोहचवावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस)
‘Chat GPT’ हा सर्वात प्रसिद्ध AI आहे. याची सुरुवात सॅम ऑल्टमनने केली होती. तेव्हा २०१५ साली त्याने ओपन एआय नावाची कंपनी तयार केली होती. त्यानंतर चॅट जीपीटी नावाचा एक व्हर्चुअल रोबोट मार्केटमध्ये आला होता. खरंतर हे एक आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सर्च इंजिन आहे.
चाय जीपीटी चा हा फोटो पाहा:
Silicon valley : we have the best start-up ideas
Indian tea shops : hold my tea pic.twitter.com/1j5WtBHowF
— SwatKat💃 (@swatic12) May 17, 2023
या व्यक्तीने आपल्या चहाच्या दुकानाचं नाव ‘chat GPT’ च्या नावावरून बदलून ‘Chai GPT’ असे ठेवले आहे. तुम्हाला वाटेल की हे एखादं chatroom सारखं काहीतरी असेल पण तसं काहीही नाहीय. हे एक साधं चहाचं दुकान आहे. पण या दुकानाला दिलेल्या अनोख्या नावामुळे हे चहाचं दुकान चर्चेचा आणि कौतुकाचा विषय बनला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community