…म्हणून आफताबची नार्को टेस्ट रद्द; नेमकं काय घडलं?

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब पूनावाला याची सोमवारी होणारी नार्को टेस्ट रद्द झाली आहे. श्रद्धाची हत्या करुन तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करणारा आफताब पोलिसांनी वेगवेगळी माहिती देत दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. यानंतर पोलिसांनी नार्को टेस्टची मागणी केली असता दिल्ली न्यायालयाने त्यासाठी परवानगी दिली होती. मात्र, सोमवारी ही नार्को टेस्ट होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

( हेही वाचा: दहिसर-अंधेरी मेट्रोसाठी फक्त ‘या’ सर्टिफिकेटची प्रतीक्षा )

…म्हणून होणार नाही नार्को टेस्ट

आफताबची नार्को चाचणी करण्याआधी पाॅलिग्राफ चाचणी करण्याची आवश्यकता आहे. पण न्यायालयाने अद्याप त्यासाठी परवानगी दिलेली नाही. या परवानग्या मिळण्यासाठी 10 दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही परवानगी मिळेपर्यंत आफताबची नार्को टेस्ट करता येणार नाही.

पाॅलिग्राफ चाचणी म्हणजे काय?

पाॅलिग्राफ चाचणीत संबंधित व्यक्ती खरे बोलत आहे की नाही? याची चाचपणी केली जाते. मात्र यामध्ये शारिरीक संकेतांकडे लक्ष दिले जाते. म्हणजेच त्याचा रक्तदाब, ह्रदयाचे ठोके, श्वसनाचा वेग या गोष्टी पाहिल्या जातात. यानंतर त्याच्या माध्यमातून ती व्यक्ती खरे बोलते आहे की खोटे याबाबत मूल्यांकन केले जाते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here