कॉर्डिलिया क्रूझवर झाडाझडतीत आणखी आठ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यापैकी एकाला एनसीबीने अटक केली आहे. शनिवारी दुपारी कॉर्डिलिया क्रूझवर एनसीबीकडून करण्यात आलेल्या कारवाईनंतर एनसीबीने आर्यन खान यांच्या सह आठ जणांना ताब्यात घेतले होते. या आठही जणांना इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनस ग्रीन गेट या ठिकाणी उतरवून क्रूझ सोडण्यात आली होती. मात्र एनसीबीने आपले काही अधिकारी या क्रूझवर ठेवले होते. क्रूझवर असलेल्या एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईहून क्रूझ निघाल्यापासून तर पुन्हा मुंबईत येईपर्यंत क्रूझवर आयोजित केलेल्या पार्टीत सामील असणाऱ्यांची चौकशी व तपासणी केली होती. त्यात ८ जण संशयित सापडले होते, तर काही आक्षेपार्ह वस्तू आढळून आलेल्या होत्या.
आरोपींची संख्या झाली अकरा!
सोमवारी सकाळी कॉर्डिलिया ही क्रूझ मुंबई बंदरात दाखल होताच एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे हे आपल्या पथकासह इंटरनॅशनल क्रूझ टर्मिनसवर दाखल झाले. दरम्यान एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी संशयित आठ जणांना ताब्यात घेऊन क्रूझची पुन्हा एकदा झाडाझडती घेतली. यामध्ये काही प्रमाणात आक्षेपार्ह साहित्य मिळाले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या दुसऱ्या खेपेतील आठ जणांपैकी एकाला या कथित रेव्ह पार्टी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडे हायड्रोफ्लोविक विड (गांजा) मिळून आले आहे. याप्रकरणात आरोपींची संख्या अकरा झाली असून ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा : आर्यन खानमुळे बॉलिवूडचे अनेकजण एनसीबीच्या रडारवर!)
Join Our WhatsApp Community