…आता ‘या’ तीन गुन्ह्याचा तपास ‘एनसीबी’चं पथक करणार नाही

81

क्रूझ ड्रग्स प्रकरणात एनसीबीचे मुंबई संचालक समीर वानखेडे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपानंतर क्रूझ ड्रग्स प्रकरणासह ६ गुन्ह्याचा तपास करण्यासाठी एनसीबीने एसआयटी गठीत केली होती. या सहा गुन्ह्याचा तपास करणाऱ्या एसआयटीकडून तीन गुन्हे वगळण्यात आले असून एसआयटी केवळ तीनच गुन्ह्याचा यापुढे तपास करणार आहे. एनसीबीच्या महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली गठीत केलेल्या एसआयटी कडून आता फक्त कॉर्डेलिया क्रूझ ड्रग छापा प्रकरण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा जावई समीर खान आणि अरमान कोहली ड्रग्स प्रकरण समावेश असणार आहे.

 म्हणून एनसीबीच्या एसआयटी कडून वगळण्यात 

एनसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “एसआयटी आता फक्त या तीन प्रकरणांची चौकशी करणार आहे. सुरुवातीला सहा प्रकरणे एसआयटीकडे हस्तांतरित करण्यात आली होती, परंतु उर्वरित तीन प्रकरणांमध्ये कोणतेही परदेशी संबंध नसल्याचे समोर आले आणि ते एनसीबीच्या एसआयटीकडून वगळण्यात आले. वगळण्यात आलेल्या तीन प्रकरणांमध्ये मुंब्रा, जोगेश्वरी आणि नागपाडा या गुन्ह्याचा समावेश आहे. हे तिन्ही गुन्हे मुंबईत नोंदवले गेले आहेत. दरम्यान एनसीबीच्या एसआयटीकडून समीर खानच्या आवाजाचे नमुने घेण्यासाठी न्यायालयासमोर अर्ज केला आहे. एनसीबीच्या सूत्रांनी सांगितले की, त्यांना समीर खान ड्रग्स प्रकरणात फॉरेन्सिक विश्लेषणादरम्यान खान आणि करण सजनानी यांच्या आवाजाचे नमुने सापडले होते आणि म्हणून एसआयटीला त्याची पुष्टी करण्यासाठी त्यांच्या आवाजाचा नमुना हवा आहे.

(हेही वाचा – शिवशाहिरांचे निर्वाण)

या प्रकरणात आरोपपत्र आधीच दाखल करण्यात आले आहे असे विचारले असता, एनसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले, “कायद्यात अशी तरतूद आहे करण्यात आली आहे की, आरोपपत्रानंतर तपास चालू ठेवता येईल. आम्हाला आणखी पुरावे मिळाल्यास आम्ही या प्रकरणात ते ठेवून पुरवणी आरोपपत्र दाखल करू शकतो, ” असे अधिकारी म्हणाले. या प्रकरणी एसआयटीकडून लवकरच समीर खानला त्याचे म्हणणे नोंदवण्यासाठी बोलाविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेष एनडीपीएस न्यायालयाने खानची सप्टेंबरमध्ये जामिनावर सुटका केली होती.

कॉर्डेलिया प्रकरणात एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि अरबाज मर्चंटसह काही आरोपींचे जबाब नोंदवले आहेत. एनसीबी एसआयटी या प्रकरणात आरोपपत्र दाखल करणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. एनसीबी एसआयटी अरमान कोहली प्रकरणात आरोपपत्रही दाखल करणार आहे. कोहलीला एनसीबीने या वर्षी ऑगस्टमध्ये १.२ ग्रॅम कोकेन बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. कोहलीशिवाय, काही कथित ड्रग्ज तस्करांनाही या प्रकरणात अटक करण्यात आली होती. एनसीबी एसआयटी आरोपींना त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी समन्स पाठवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.