साईबाबा संस्थानाकडे फक्त मंदिर देखभाल

144

शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या नव्या विश्वस्त मंडळाला दैनंदिन कामकाज पाहण्यास मनाई करणा-या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे नव्या विश्वस्त मंडळाला दिलासा मिळाला आहे.
आता नव्या विश्वस्त मंडळाला दैनंदिन कामकाज पाहता येणार आहे. मात्र मंडळाने मोठे आर्थिक आणि धोरणात्मक निर्णय घेऊ नयेत, असं आदेशात म्हटलं असून, पुढील सुनावणी दोन महिन्यांनी करण्यात येणार आहे.

सर्वोच्च न्यायालयात दिले होते आव्हान

राज्य सरकारने नव्या विश्वस्त मंडळाची नियुक्ती केली, मात्र काही जागा रिक्त आहेत. यासंबंधी दाखल झालेल्या  एका याचिकेवर निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अशा अपु-या मंडळाला कामकाज पाहता येणार नाही, असं सांगत मनाई आदेश दिला होता. शिवाय न्यायालयाच्या देखरेखीखाली समिती नेमून कामकाज पाहण्याचा आदेश दिला होता. याला विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

आर्थिक, धोरणात्मक निर्णय घेण्यास बंदी

सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायलयाच्या आदेशाला पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली. मात्र या काळात विश्वस्त मंडळाने केवळ दैनंदिन कामकाज पाहावे. मोठे धोरणात्मक आणि आर्थिक निर्णय घेऊ नयेत, असंही आदेशात म्हटले आहे.

 (हेही वाचा : ट्विटरचे अग्रवाल यांचे ‘ते’ ट्विट पुन्हा आले चर्चेत )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.