घामाच्या धारांनी कंटाळलेल्या मुंबईकरांना आता वातावरण बदलामुळे हळूहळू सर्दी, खोकल्याचा त्रास होऊ लागला आहे. मुंबईत गेल्या आठवड्याभरात रुग्ण वाढल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत व्हायरल फिव्हरचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये तब्बल 30 टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती फिजिशिअन डॉ. दीपक बैद यांनी दिली. या रुग्णांना ताप नियंत्रणात येण्याच्या गोळ्या दिल्या जात आहेत. रुग्ण स्वतःहूनच वेळेवर उपचार घ्यायला येत असल्याचेही ते म्हणाले. मुंबईकरांनी सर्दी, खोकला, ताप अजिबात अंगावर काढू नका असे आवाहनही डॉ. बैद यांनी केले.
ताप असेल तर कोरोना चाचणी करा
Join Our WhatsApp Communityतापाच्या रुग्णांनी तब्येतीकडे दुर्लक्ष करू नये. रुग्णांनी तातडीने कोरोना चाचणी करून घ्यावी.
आरोग्य विभाग, मुंबई महानगरपालिका