रुग्ण वाढीचा पारा पुन्हा वर चढला…

मुंबईत मागील चार दिवसांपासून नियंत्रणात असलेली कोविड रुग्णांची आकडेवारी खालच्या दिशेला सरकताना दिसत असतानाच, बुधवारी पुन्हा या रुग्ण संख्येने उसळी घेतली आहे. बुधवारी दिवसभरात १६ हजार ४२० नवीन रुग्ण आढळून आले आहे. तर दिवसभरात १४ हजार ६४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर दिवसभरात सात जणांचा मृत्यू झाला आहे.

१३ हजार ७९३ लक्षणे नसलेले रुग्ण

मुंबईत मंगळवारी जिथे ६२ हजार ०९७ चाचण्या केल्यानंतर ११ हजार ६४७ नवीन रुग्ण आढळून आले होते, तिथे बुधवारी ६७ हजार ३३९ चाचण्या केल्यानंतर १६ हजार ४२० नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर यापैकी १३ हजार ७९३ रुग्ण हे लक्षणे नसलेले असून दिवसभरात यापैकी ९१६ रुग्णांना रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. यातील ९८ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली होती. मुंबईतील विविध कोविड सेंटर आणि रुग्णालयांमध्ये एकूण ६ हजार ९४६ रुग्णांना दाखल करण्यात आले होते, यातील ९१६ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली आहे. तर एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख ०२ हजार २८२ एवढी झाली आहे. दिवसभरात १४ हजार ६४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर दिवसभरात ७ जणांचा मृत्यू झाला होता.

( हेही वाचा : ‘या’ कामांच्या जोरावर आदित्य ठाकरे मारणार निवडणुकीत बाजी! )

मृत्यू पावलेले सातही रुग्ण हे दीर्घकालिन आजारांचे होते. त्यात ५ रुग्ण पुरुष तर २ रुग्ण या महिला होत्या. हे सातही रुग्ण साठीपार होते. तर मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर हा ३६ दिवस एवढा आहे. तर झोपडपट्टया व चाळींच्या सक्रिय कंटेन्मेंटची संख्या शुन्यावर आली असून सक्रिय सीलबंद इमारतीची संख्या ५६ एवढी होती.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here