रविवारी ओमायक्रॉन रुग्णांच्या नव्या नोंदीत पहिल्यांदाच सांगलीत ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद जास्त आढळली. मुंबईपेक्षाही सांगली जिल्ह्यात ओमायक्रॉनचा फैलाव अधिक असल्याचे समोर आले आहे. सांगलीत ५७ नवे ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले. रविवारी राज्यातील नव्या ओमायक्रॉनच्या नव्या नोंदीत २५ टक्के रुग्ण सांगलीत दिसून आले. राज्यातील नव्या ओमायक्रॉनबाधित रुग्णांचा आकडा २०७ वर पोहोचला आहे.
सांगलीखालोखाल मुंबईत नव्या रुग्णांची नोंद
सांगलीखालोखाल मुंबईत ओमायक्रॉनच्या नव्या रुग्णांची नोंद झाली. मुंबईत ४० तर पुण्यात २२ नव्या रुग्णांची नोंद झाली. नागपूरात २१, पिंपरी चिंचवडमध्ये १५, ठाण्यात १२, कोल्हापूरात ८ ओमायक्रॉनचे नवे रुग्ण दिसून आले. अमरावतीत ६, बुलडाणा आणि अकोल्यात प्रत्येकी ४ नवे ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले. गोंदियात ३, नंदूरबार, सातारा, गडचिरोलीत प्रत्येकी २ आणि औरंगाबाद, जालना, लातूर आणि मीरा भाईंदरमध्येही प्रत्येकी एक नवा रुग्ण आढळून आला.
(हेही वाचा –जिम, ब्युटी पार्लरला जाताय? वाचा ठाकरे सरकारचा सुधारित आदेश)
राज्यातील आतापर्यंतची आकडेवारी हजारपार
राज्यात आतापर्यंत १ हजार २१६ ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ४५४ रुग्णांवर यशस्वी उपचार करुन घरी सोडण्यात आले. आता राज्यात केवळ ७६२ सक्रीय रुग्ण विविध भागांत उपचार घेत आहेत.
जनुकीय तपासणीच्या प्रयोगशाळा वाढवण्यावर भर
वाढत्या ओमायक्रॉनचाप पसारा लक्षाक घेत कोरोना तपासणी पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांच्या जनुकीय तपासणीचा अहवाल आता वेगवेगळ्या प्रयोगशाळांना दिला जात आहे. अगोदर हा अहवाल पुण्याची राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था देत होती. आता या संस्थेसोबत पुण्यातील बी जे वैद्यकीय महाविद्यालय तसेच राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था आणि राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्रातूनही जनुकीय चाचण्या केल्या जात आहेत.
Join Our WhatsApp Community