माणसाचं मुंडकं उडवणारा ‘तो’ वाघ पकडला!

117

चंद्रपूर मधील माणसाचे मुंडके उडवणाऱ्या वाघाला पकडण्याचे आदेश जारी होताच वनविभागाच्या बचाव पथकाने 24 तासांच्या आत वाघाला शोधून जेरबंद केले. चंद्रपूर येथील महाविद्युत औष्णिक केंद्रात सलग दोन हल्ल्यानंतर वाढता स्थानिकांमध्ये घबराहटीचे वातावरण होते. या भागात वावरणाऱ्या अजून तीन वाघानाही लवकरच जेरबंद केले जाणार आहे. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास वाघाला बेशुद्द करून जेरबंद करण्यात आले. त्यावेळी हल्लेखोर वाघाला पाहण्यासाठी स्थानिकांची मोठ्या संख्येने गर्दी झाली. बुधवारी कामागारावर हल्ला करणाऱ्या वाघालाच पहिले वनविभागाने पकडल्याचे बोलले जात आहे.

काय आहे प्रकरण?

गेल्या बुधवारी रात्री गेली अकरा दिवस ११ हजार २३७ हॅक्टर परिसरातील महाविद्युत औष्णिक विद्युत केंद्रातील मानवी वसाहतीतजवळ वाघ सलग काही दिवस फिरत असल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर फिरत होता. व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असतानाच बुधवारी भोजरात मेश्राम (५६) या कामगाराला वाघाने जवळपास १०० मीटर फरफटत नेले. या हल्ल्यात मेश्राम यांचे डोकेच वाघाने शरीराबाहेर काढले तर डाव्या हाताचा काही भाग खाल्ला.

(हेही वाचा – धक्कादायक! टोल नाक्यावर गाडी थांबवणे ठरतेय धोकादायक!)

प्रकरण का चिघळले?

या हल्ल्याच्या दुस-याच दिवशी गुरुवारी रात्री राजू बडखे (१६) या युवकावर बिबट्याने हल्ला केला. वेस्टर्न कोअलफिल्ड लिमिटेड या भागांतील मैदानात बसलेल्या राजूवर बिबट्याने हल्ला चढवत त्याला ७० मीटर फरफडत नेले. शुक्रवारी राजूचा मृतदेह वनाधिका-यांना मिळाला.

मानव वन्यप्राणी संघर्ष का वाढतोय?

चंद्रपूरातील महाविद्युत औष्णिक केंद्रात गेल्या सहा वर्षांपासून वाघ-बिबट्याचा वावर दिसून येत आहे. याआधी वनविभागाच्या नोंदीतही महाविद्युत औष्णिक केंद्रात वाघाचा अधिवास होत असल्याचे दिसून आले आहे. वाघ आणि बिबट्यांचा वावर लक्षात घेता भविष्यात ही वादाची ठिणगी नक्कीच भडकणार, असे भाकीत सहा वर्षांपूर्वीच वन्यजीवप्रेमींनी व्यक्त केले होते. या भागांत अस्वलाचेही अधूनमधून दर्शन होते.

वाघाला पकडणारी टीम

वाघाला पकडण्यासाठी वनविभागाच्या चार टीम तैनात करण्यात आल्या होत्या. यासह चंद्रपूरातील प्रादेशिक वनविभागाची टीमही घटनास्थळी दाखल होती. वाघाला बंधूकीतून बेशुद्ध करण्याचे काम चंद्रपूरातील ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्पतील बचाव पथकाने केले. यात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ रविकांत खोब्रागडे, अजय मराठे, राकेश आहुजा, पवन कुळमेठे, पवन माहुर्ले, भोजराज दांडेकर, अमोल कोपरे, अमोल तिखट आणि ननावरे यांचा समावेश होता

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.