टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या वाहनाचा ज्या ठिकाणी अपघातात झाला त्या ठिकाण ‘ब्लॅक स्पॉट’ असल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणावर या पूर्वीदेखील अपघातात अनेकांनी आपले प्राण गमावल्याचे समोर आले आहे. दमन येथील बायकर्स क्लबने वाहन चालकांना सावध करण्यासाठी मोहीमदेखील राबवली होती असेदेखील समोर येत आहे.
पालघर जिल्ह्यातील मुंबई अहमदाबाद महामार्गावर असलेल्या चारोटी पुलाजवळ रविवारी टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या वाहनाला अपघात होऊन त्यात मिस्त्री यांचा मृत्यू झाला आहे. ज्या ठिकाणी मिस्त्री यांच्या वाहनाचा अपघात झाला ते ठिकाण ‘ब्लॅक स्पॉट’ असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. यापूर्वी या ठिकाणी झालेल्या अपघात अनेकांचा मृत्यू झाला आहे. २०१४ पासून हे ठिकाण धोकादायक बनले असून २०१८ मध्ये या ठिकाणी सांताक्रुज येथील व्यवसायिक असलेले दुबे कुटुंबियांच्या वाहनाला अपघात झाला होता त्यात पाच जण जखमी झाले होते तर दोघांचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी आदित्य सुब्रम्हण्यम या तरुणाचा मोटारसायकल अपघातात या ठिकाणी मृत्यू झाला होता.
( हेही वाचा: चंद्रशेखर बावनकुळे बारामती दौ-यावर; म्हणाले बारामती जिंकणारच… )
…म्हणून ती जागा ‘ब्लॅक स्पॉट
दमन येथील युनायटेड सुपरबायकर्स क्लब या गटाने दुचाकीस्वारांचे वारंवार होणारे अपघात आणि मृत्यू लक्षात घेऊन, या मार्गावर चाचणी मोहीम राबवली आणि त्यानंतर २०१४ मध्ये या ठिकाणी वाहनचालकांना सावध करण्यासाठी मोहीम आयोजित केली. स्थानिक अधिकाऱ्यांच्या मदतीने रंबल स्ट्रिप्स आणि साइनबोर्डदेखील लावण्यात आले होते, अशी माहिती या बायकर्स क्लबचे अभिषेक चौधरी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली. चौधरी पुढे म्हणाले, “२०१४ मध्ये या मार्गावर वारंवार अपघात होत होते, म्हणून आम्ही तेथे मोहीम राबवली. दर रविवारी आम्ही तिथे गाडी चालवत रस्त्यावर उभं राहून चालक आणि दुचाकीस्वारांना वेग कमी करण्याच्या सूचना देत असू. आम्ही तेथे रुग्णवाहिकाही ठेवली आहे जेणेकरून अपघात झाल्यास जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी.” या ठिकाणी एवढे अपघात का होतात यावर बोलताना ते म्हणाले, “या जागेच्या दोन्ही बाजू धोकादायक आहेत. अचानक वळणे येतात. रस्ता तीव्र वळणासह चढ आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांना त्रास होतो. खराब रस्त्याच्या अभियांत्रिकीमुळे अचानक उंची वाढली आहे. परंतु थोडी सावधगिरी बाळगल्यास जीव वाचू शकतात,” असे चौधरी म्हणाले.
Join Our WhatsApp Community