पत्नीच्या मित्राची हत्या करून ‘तो’ चालवायचा एसीपीचे वाहन! 

एसीपीच्या कार्यालयाजवळ मृतदेह मिळाल्यामुळे मुंबई पोलिस दलात खळबळ उडाली होती. तब्बल १५ दिवसांनी या खुनाचा उलगडा गुन्हे शाखेने केला.

123
पत्नीच्या मित्राची निर्घृणपणे हत्या केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तो कर्तव्यावर रुजू झाला होता. सहाय्यक पोलिस आयुक्त असणाऱ्या मॅडमला पुसटशी कल्पना देखील नव्हती की, आपल्या वाहनावर जो चालक आहे तो एक खुनी आहे. मात्र ज्या दिवशी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला अटक केली, त्यावेळी मात्र एसीपींना धक्काच बसला! आपल्याच हद्दीत घडलेल्या एका खुनातील आरोपी चक्क आपला वाहन चालक होता, या खुनानंतर तो काही दिवस चक्क आपले वाहन चालवत होता, अजूनही त्यांना तो प्रसंग आठवला की अंगावर शहारे येत असावेत.

१५ दिवसांनी खुनाचा उलगडा

सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) यांच्या कार्यालय जवळ ३० सप्टेंबर रोजी सकाळीच एका पुरुषाचा मृतदेह तुकडे करून बेडशीटमध्ये गुंंडाळलेल्या अवस्थेत मिळाला होता. या तुकड्यामध्ये मुंडके मात्र गायब असल्यामुळे मुतदेहाची ओळख पटवण्यात येत नव्हती. एसीपीच्या कार्यालयाजवळ मृतदेह मिळाल्यामुळे मुंबई पोलिस दलात खळबळ उडाली होती. तब्बल १५ दिवसांनी या खुनाचा उलगडा गुन्हे शाखेने करून मुंबई पोलिस दलातील वाहन चालक पोलिस शिपाई शिवशंकर गायकवाड आणि त्याच्या पत्नीला गुन्हे शाखने अटक केली. अटक करण्यात आलेला पोलिस शिपाई वाहन चालक गायकवाड हा ज्या हद्दीत मृतदेह सापडला त्याच हद्दीतील एसीपीच्या वाहनावरील चालक निघाल्यामुळे सर्वांना धक्काच बसला होता. मात्र सर्वात मोठा धक्का बसला असेल तर एसीपी मॅडमला! कारण हत्येच्या दुसऱ्याच दिवसापासून शिवशंकर गायकवाड हा कर्तव्यावर हजर राहून एसीपी मॅडमचे पोलिस वाहन चालवत होता. शिवशंकर याने ज्या पद्धतीने हा खून करून क्रूरपणे त्याचे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावली हे समजल्यानंतर एसीपी मॅडम चांगल्याच हादरल्या होत्या. आजही त्यांना प्रसंग आठवला की अंगावर शहारे येत असावे, असे काही पोलिस अधिकारी यांचे म्हणणे आहे.

असा केला होता खून!

शिवशंकर याने पोलिस वसाहतीत असणाऱ्या खोलीत पत्नीचा बालपणीचा मित्र असणारा दादा जगदाळे याचा गळा चिरून हत्या केली, त्यानंतर घरातच मृतदेहाचे कोयत्याने अवयव वेगळे केले होते. त्यानंतर पत्नीसोबत रात्रीतून त्याने मुंडके मानखुर्द येथील कचराकुंडीत टाकून बाकीचे धड त्याने अँटॉप हिल येथे एसीपी कार्यालयाजवळ फेकले होते. पत्नीच्या मित्रासोबत झालेल्या वादातून ही हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने पत्नीची मदत घेतली होती. पतीला मदत केल्याप्रकरणी या गुन्हयात पत्नीचा सहभाग आढळून आल्यामुळे गुन्हे शाखेने तीला देखील या गुन्हयात अटक केली होती.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.