अंघोळ करताना महिलेला चोरून बघणे कॉन्स्टेबलला पडले महागात…

महिलेला आंघोळ करताना चोरून पाहणे एका पोलिसाला चांगलेच महागात पडले आहे. या पोलिस कॉन्स्टेबल विरोधात भोईवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. अक्षय चौगुले (३१) असे या पोलिस कॉन्स्टेबलचे नाव असून यापूर्वी देखील त्याच्यावर विनयभंग तसेच चोरीचे गुन्हे दाखल असून, त्याला निलंबित करण्यात आले आहे.

पोलिसांकडून विनयभंगाचा गुन्हा केला दाखल

दादरच्या भोईवाडा परिसरातील एका इमारतीत राहणारी एक महिला तिच्या बाथरूममध्ये आंघोळ करीत असताना, आपल्याला खिडकीतून कोणीतरी डोकावून बघत असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने आरडाओरड करताच खिडकीतून डोकावणा-या व्यक्तीने तेथून पळ काढला. मात्र ही डोकावणारी व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून, त्याच इमारतीत राहणारा निलंबित पोलिस कॉन्स्टेबल अक्षय चौघुले असल्याचे कळताच, तिने भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून गुरुवारी त्याला अटक केली.

( हेही वाचा:राज्यात कोरोनाचा तिसऱ्या दिवशीचा रेकॉर्ड काय? जाणून घ्या…)

संताप व्यक्त होत आहे

चौकशीमध्ये या कॉन्स्टेबलवर हा चौथा गुन्हा नोंदवण्यात असल्याचे समोर आले. भोईवाडा पोलिस ठाण्यात त्याच्यावर विनयभंग आणि चोरीचा, तर रफी अहमद किडवाई मार्ग पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात अटक झाल्यानंतर अक्षय याला २०१८ मध्ये पोलिस सेवेतून निलंबितही करण्यात आले होते, मात्र इतके होऊनही त्याचे प्रताप सुरूच असल्याने संताप व्यक्त होत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here