मालदीवच्या अध्यक्षांना मुंबईच्या चित्रनगरीची भुरळ

सिनेक्षेत्रात पाय रोवू इच्छिणाऱ्यांसाठी मुंबईतील दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणजे स्वप्ननगरीच. या चित्रनगरीने मालदीवच्या अध्यक्षांनाही भुरळ घातली आहे. मालदीव प्रजासत्ताकचे अध्यक्ष इब्राहिम मोहमद सोलिह यांच्यासह शिष्टमंडळाने गुरुवारी गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीला भेट दिली. चित्रनगरीमधील बॉलिवूड पार्क आणि क्रोमा स्टुडिओ पाहून ते प्रभावित झाले.

मुंबईच्या चित्रनगरीची भुरळ

मालदीवच्या अध्यक्षांसह शिष्टमंडळात अर्थमंत्री इब्राहिम अमीर, आर्थिक विकास मंत्री फैय्याज इस्माईल, भारताचे उच्चायुक्त मुनू महावार यांचा समावेश होता. या भेटीदरम्यान चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार, सह व्यवस्थापकीय संचालक कुमार खैरे,चित्रनगरीचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

( हेही वाचा : आफ्रिकन ‘स्वाईन फिवर’ विषयी केंद्र सरकारचे राज्यांना सतर्कतेचे आदेश )

बॉलिवूड पार्क मध्ये मराठी, हिंदी आणि मालदीव भाषेतील नृत्याबरोबर कॉमेडी शो आयोजित करण्यात आला होता. क्रोमा स्टुडिओ मध्ये चित्रीकरणापूर्वी आणि नंतर कसे बदल, इफेक्ट्स केले जातात याचे प्रात्यक्षिक यावेळी दाखविण्यात आले. या शिष्टमंडळाने ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेच्या सेटला भेट दिली. मालदीवमध्ये पर्यटन आणि उद्योगाच्या संधींबरोबरच चित्रीकरणासाठी आवश्यक असणारी अनेक स्थळे असून ती भारतीय निर्मात्यांच्या पसंतीची चित्रीकरण स्थळ असल्याचे भीमनवार यांनी यावेळी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here