काही दिवसांपूर्वी म्हणजेच मंगळावर २५ एप्रिल रोजी देशातील अनेक शहरांमध्ये इंधनाच्या किंमतीत बदल झाला होता. कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये बदल झाल्याने इंधनाच्या दरामध्ये बदल झाला होता. अशातच आता मिळलेल्या माहितीनुसार व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Price) दरात कपात झाली आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच तेल विपणन कंपन्यांनी मोठा दिलासा दिला आहे.
(हेही वाचा – Petrol And Diesel Price: कच्च्या तेलाच्या किंमतीत बदल; लवकरच देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरावर होणार परिणाम)
कंपन्यांनी १ मे पासून १९ किलो व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या (LPG Gas Price) किमती १७१.५० रुपयांनी कमी केल्या आहेत. त्यामुळे आजपासून देशाची राजधानी दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची (LPG Gas Price) किंमत १८५६.५० रुपये झाली आहे. तर आर्थिक राजधानी मुंबईत १९ किलोच्या एलपीजी सिलेंडरसाठी १८०८.५० रुपये मोजावे लागणार आहे. दरम्यान घरगुती एलपीजी सिलेंडरच्या (LPG Cylinder) दरात मात्र कोणताही बदल झालेला नाही.
हेही पहा – https://www.youtube.com/watch?v=aMdA7CcEfNM&t=5s
व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात दोन महिन्यात २६३ रुपयांची कपात
याआधी १ एप्रिल रोजी म्हणजेच महिनाभरापूर्वी व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या (LPG Gas Price) दरात ९१.५० रुपयांनी कपात करण्यात आली होती. त्यानंतर सोमवार १ मे रोजी १९ किलो एलपीजी सिलेंडरचे दर १७१.५० रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. अशाप्रकारे व्यावसायिक एलपीजी सिलेंडर मागील दोन महिन्यांत २६३ रुपयांनी स्वस्त झाला आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोलियम कंपन्या एलपीजी सिलेंडरचे नवीन दर ठरवतात.
Join Our WhatsApp Community