कुर्ला, विद्याविहारसह टिळक नगर ब्रीज रेल्वे मार्गावर पाणी तुंबण्याची समस्या मिटणार

87

कुर्ला आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान सूक्ष्म बोगद्याद्वारे पाईप पुशिंग, ७० मीटर लांबीच्या १.८ मीटर व्यासाच्या दोन पाइपलाइन पुश करण्यात आल्या आहेत. ज्यामुळे पुलाची क्षमता वाढली असल्याचा दावा मध्य रेल्वेने केला आहे. त्याचप्रमाणे, टिळक नगर ब्रिज येथे जलमार्ग वाढवण्यात आला असून टिळक नगर स्थानकावर आरसीसी बॉक्सेस टाकून जलमार्गाची क्षमता वाढवण्यासाठी ४.९ मीटर अतिरिक्त ओपनिंग तयार केले आहे. ज्यामुळे या भागातील पाणी समस्या आता काहीशी कमी होणार आहे.

( हेही वाचा : मुलुंडमध्ये सर्वाधिक अतिधोकादायक इमारती )

मध्य व पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या हद्दीतील मान्सूनच्या तयारीचा आढावा घेतला. प्रधान विभागप्रमुख आणि मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या उपस्थितमुंबई विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित रेल्वेने केलेल्या पावसाळ्याच्या तयारीबाबतचे सादरीकरण या बैठकीत केले. या बैठकीत पनवेल आणि कर्जत दरम्यानच्या सध्याच्या पुलाला लागून असलेल्या पुलाच्या जलमार्गात आरसीसी बॉक्स टाकून सुधारणा केल्याने जलमार्गाची क्षमता वाढली आहे. पाण्याचा प्रवाह वाढवण्यासाठी बदलापूर ते वांगणी दरम्यान १.८ मीटर व्यासाचा पाइप टाकण्यात आला आहे. मध्य रेल्वेने महत्त्वाच्या वालधुनी पुलाच्या पीएसबी स्लॅबसह स्टील गर्डर बदलले असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे.

महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य

  • या पावसाळ्यात केलेल्या कामाच्या परिणामकारकतेसाठी शीव -कुर्ला परिसरातील ३ ठिकाणे निरीक्षणाखाली असतील.
  • राहुल नगर नाला, चुनाभट्टी येथील पंपिंगची व्यवस्था या पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येईल.
  • कर्वे नगर नाला सुधारणेचे काम मुंबई महानगर पालिका द्वारे केले जाणार आहे आणि त्याचा खर्च अजमेरा बिल्डर्सकडून वसूल केला जाणार आहे.
  • प्रियदर्शनी, चुनाभट्टी येथे जलवाहिनीखाली साठलेले काँक्रीट साफ करण्याच्या कामासाठी सल्लागाराची नियुक्ती करणे.

महत्वाची चालू असलेली कामे

  • विद्याविहार, कर्वे नगर, संतोषी माता नाला येथील नाल्यांचे रुंदीकरण.
  • चुनाभट्टी येथे मुंबई महानगर पालिका (एमसीजीएम) नाल्याला नव्याने बांधलेल्या रेल्वे कल्व्हर्टच्या जोडणीचे काम.
  • घाट विभागात १४५ असुरक्षित ठिकाणी सीसीटीव्ही आणि फ्लड लाइट बसवणे.

या भागातील झाली कामे पूर्ण :

  • मशीद, सँडहर्स्ट रोड, हिंदमाता- दादर- परळ परिसरात सूक्ष्म बोगद्याची कामे पूर्ण.
  • मस्जिद, भायखळा, माटुंगा आणि शीव -कुर्ला भागात फ्लड गेट्स बसवणे.
  • एमएसएफ जवान + आरपीएफ कर्मचारी दृत प्रतिसाद दल म्हणून राहतील.
  • एनडीआरएफच्या सहकार्याने आरपीएफ फ्लड रेस्क्यू टीम तयार करण्यात आली.
  • गर्दीचे गंभीर पादचारी पूल निवडून तेथे गर्दी नियंत्रणासाठी कर्मचारी तैनात.
  • बोगदा आणि घाटातील सुधारित दळणवळण व्यवस्था. (लीकी केबल आणि VHF)
  • सुरक्षित ठिकाणी अतिरिक्त कायम चौकीदार
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.