चेंबूर मधील आर. सी. एफ. परिसरातील चरई नाला, वढवली नाला व रिफायनरी नाला येथे रेल्वे मार्गाच्या बाजूस असलेल्या आर.सी.एफ. च्या आवारात प्रवाहाच्या दिशेने असलेल्या नाल्याची आता जोडणी केली जाणार आहे. या नाल्याची जोडणी केली जाणार असल्याने सिंधी सोसायटी, कोकण नगर, विवेकानंद कॉलेज आदी परिसरामधील तुंबणारी समस्या दूर होणार आहे.
पूरसदृष्य परिस्थिती नियंत्रणात येणार
चेंबूर कलेक्टर कॉलनी, सिंधी सोसायटी, विवेकानंद कॉलेज परिसरातील व आर. सी. एफ. आवारात प्रवाहाच्या दिशेने नाला जोडणी करण्याबाबतचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे. रेल्वे परिसरातील चरई नाला, वडवली नाला आणि रिफायनरी नाला मोरी पेटीकेचे रेल्वे हद्दीतील काम रेल्वे प्रशासना मार्फत करण्यात आलेले आहे. या मोरी पेटीका रेल्वे हद्दीबाहेर अस्तित्वात असलेल्या नाल्यांना जोडले जाणे आवश्यक आहे. या कामामुळे उपनाला प्रणालीमधील पावसाळी पाणी प्रवाह अव्याहत सुरु होईल. या कामामुळे सिंधी सोसायटी, कोकण नगर, विवेकानंद कॉलेज येथील पावसाळ्यातील पूरसदृष्य परिस्थिती नियंत्रणात येऊ शकणार आहे.
(हेही वाचा – गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याविरोधात का झाला गुन्हा दाखल? वाचा…)
नाल्यांच्या जोडणीसाठी ८.४७ कोटी रुपये खर्च
त्यामुळे महापालिकेने या कामासाठी निविदा मागवून ठेकेदाराची निवड केली आहे. या निविदेमध्ये दिव्या कंस्ट्रक्श्यन कंपनी ही पात्र ठरली असून या नाल्यांच्या जोडणीच्या कामासाठी ८.४७ कोटी रुपये खर्च केले आहे. विशेष म्हणजे या नाल्याच्या कामासाठी मागवलेल्या निविदेमध्ये कंत्राटदाराने महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा उणे ३४ टक्के कमी दराने बोली लावून काम मिळवले आहे. त्यामुळे ३० टक्क्यांपेक्षा कमी बोली लावून काम करणाऱ्या संस्थांकडून कामाचा दर्जा योग्यप्रकारे राखला जात नाही अशाप्रकारचा शेरा महापालिकेकडूनच मारला जात असताना आता ३४ टक्के कमी दराने काम कशाच्या आधारे प्रशासन देण्याचा प्रयत्न करतो,असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासना या नाल्याचे काम योग्यप्रकारे करायचे नाही का प्रश्न उपस्थित होत आहे.
Join Our WhatsApp Community