‘सिल्वर ओक’ वर हल्ला करणारे काही आंदोलक हे मद्यप्राशन करून आले होते हे वैद्यकीय अहवालात सिद्ध झाले आहे. आंदोलकांना मद्य पुरवणारी व्यक्ती कोण आहे, त्यामागे काय हेतू होता याचा शोध तपास यंत्रणा घेत आहे.
( हेही वाचा : आम्ही त्या बंगल्याजवळ चप्पला सोडल्या, सिल्वर ओक वरील हल्ला पूर्वनियोजित कट )
वैद्यकीय अहवालातून सिद्ध
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या ‘सिल्वर ओक’ वर ८ एप्रिल रोजी झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कट होता, हे जवळ जवळ सिद्ध झाले आहे. तसेच सिल्वर ओकवर हल्ला करणाऱ्या आंदोलकामध्ये ११ जण दारूच्या नशेत होते, व सर्वात अधिक नशेत असणाऱ्या आंदोलकांनी हल्ल्यात पुढाकार घेतला होता अशी माहिती समोर आली असून या अकरा आंदोलकांनी मद्यप्राशन केले होते हे वैद्यकीय अहवालातून सिद्ध झाले आहे.
आंदोलकाना मद्य कोणी पुरवले, त्या व्यक्तीचा शोध घेतला जात असून मद्य पुरवून आंदोलन करण्यासाठी सांगण्यामागे नक्की काय उद्देश होता? याचा शोध तपास यंत्रणा घेत आहे.
Join Our WhatsApp Community