अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचा 2021 चा आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य अहवाल परराष्ट्रमंत्री अॅण्टनी ब्लिकंन यांच्या हस्ते गुरुवारी प्रकाशित झाला. त्यात जगभरातील धार्मिक स्वातंत्र्याची स्थिती आणि उल्लंघनाविषयी भाष्य आहे. भारतात अल्पसंख्यांकावर हल्ले होत असल्याची टिप्पणीही त्यात करण्यात आली आहे. त्यावर भारताने ही तीव्र प्रतिक्रिया दिली.
हल्ले होत असल्याचा आरोप करणा-या धार्मिक स्वातंत्र्याबाबतच्या अमेरिकेच्या अहवालावर परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आणि अमेरिकेच्या वरिष्ठ अधिका-याने अर्धवट माहितीच्या आधारे केलेले भाष्य अशा शब्दांत त्या अहवालावर भारताने अमेरिकेला सुनावले. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्येही मतपेढीचे राजकारण करणे दुर्दैवी आहे, अशी टीकाही भारताने केली.
( हेही वाचा :मोठी बातमी: राज्यात पुन्हा मास्क बंधनकारक )
धार्मिक स्वातंत्र्य अहवालात काय?
धार्मिक अल्पसंख्यांक समुदायाच्या नागरिकांवर हल्ले होणे, त्यांच्या हत्या करणे, त्यांना धमकावणे आदी घटना 2021 मध्ये संपूर्ण वर्षभर घडल्या. त्यात गोहत्या किंवा गोमांसाची विक्री केल्याच्या आरोपावरुन गोरक्षणाच्या नावाखाली घडलेल्या घटनांचा समावेश आहे.
अमेरिकेबाबत चिंता
अमेरिकेशी होणा-या संवादादम्यान आम्ही अमेरिकेत वांशिक द्वेषातून होणा-या हल्ल्यांविषयी, गोळीबारासारख्या हिंसाचाराविषयी सातत्याने चिंता व्यक्त केली आहे, असे भारताच्या परराष्ट्र विभागाने निवेदनात म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community