भाजपच्या ‘मुंबईचा मोरया’ गणेशोत्सव स्पर्धेचा निकाल जाहीर! ‘या’ गणेशोत्सव मंडळांनी मारली बाजी

भारतीय जनता पार्टी मुंबईच्या वतीने आयोजित ‘मुंबई मोरया’ गणेशोत्सव स्पर्धेत मागाठाणे नवतरुण मित्र मंडळ सर्वोत्कृष्ट सजावट व देखावा गटात प्रथम क्रमांक तर अनुक्रमे घाटकोपर येथील श्री लक्ष्मीनारायण बाल गणेश तरुण मंडळ सर्वोत्कृष्ट मूर्ती गटात, ना. म. जोशी मार्ग पंचगंगा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सर्वोत्कृष्ट स्वच्छता परिसर व सामाजिक कार्य गटात प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. विजेत्यांना प्रत्येकी ३ लाख रुपये व चषक असे बक्षीस देण्यात आले.

( हेही वाचा : ‘महापौर’ या शब्दाची भेट स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्याला दिली – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस)

पारितोषिक सोहळा मंगळवारी दादर शिवाजी मंदिर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शीव प्रकाश, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा मुंबई अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. मुंबई भाजपने आयोजित केलेल्या स्पर्धेत तब्बल १०२६ मंडळांनी सहभाग घेतला.

स्पर्धेत ३ लाखांचे प्रथम पारितोषिक, दुसऱ्या क्रमांकासाठी १ लाख ५० हजार रुपये तर तृतीयसाठी ७५ हजार रुपये बक्षीस देण्यात आले. ११ हजाराची १२ उत्तेजनार्थ तर मुर्तीकार आणि परिसर स्वच्छता, देखावा यासाठीही बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेचे विजेते ठरविण्यासाठी ३० तज्ञ गटांची स्थापना करण्यात आली होती. या स्पर्धेत प्रथम फेरीत ६७ मंडळ पात्र झाले. त्यापैकी २१ मंडळाची विजेते म्हणून निवड करण्यात आली. मुंबईच्या सहा विभागातून समप्रमाणात पारितोषिकाचे वितरण करण्यात आले. मुर्तीची सुबकता, सजावट, स्वच्छता आणि सामाजिक संदेश या निकषांवर निष्पक्ष निर्णय घेऊन स्पर्धा समितीने २१ विजेत्यांची निवड केली. स्पर्धेच्या ५०० रुपये प्रवेश शुल्कातून जमा झालेले ५ लाख १३ हजार रुपये हे पंतप्रधान सहाय्यता निधी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात आले आहेत.

निकाल अनुक्रमे असा

सर्वोत्कृष्ट मूर्ती- द्वितीय क्रमांक-शरद मित्र मंडल – वर्सोवा (रू. दिड लाख व चषक), तृतीय क्रमांक
फोर्ट विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, फोर्टचा इच्छापुर्ती गणेश (रू. पंचाहत्तर हजार व चषक)

सर्वोत्कृष्ट सजावट व देखावा
द्वितीय क्रमांक- ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, माझगाव (रू. दिड लाख व चषक), तृतीय क्रमांक- श्री. गणेश क्रिडा मंडळ, अंधेरी (पूर्व) (रू. पंचाहत्तर हजार व चषक)

सर्वोत्कृष्ट स्वच्छता परिसर व सामाजिक कार्य
द्वितीय क्रमांक- पिंपळेश्वर मित्र मंडळ, वाळकेश्वर (रू. दिड लाख व चषक), तृतीय क्रमांक- चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ, चिंचपोकळीचा चिंतामणी (रू. पंचाहत्तर हजार व चषक)

उत्तेजनार्थ पारितोषिक
(रूपये ११ हजार व प्रमाणपत्र)
शांतीनगर रहिवाशी संघ मुलुंड (प.), बांद्रेकरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ- जोगेश्वरी (पूर्व), बाळगोपाळ मित्र मंडळ सार्वजनिक श्री. गणेशोत्सव, विलेपार्ले, सराफ चौधरी नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कांदीवली पू., साई गणेश वेलफेअर असोसिएशन, बोरीवली (प.), महाराष्ट्र ऐक्यवर्धक मंडळ – चेंबूर, सार्वजनिक गणेशोत्सव समिती, सिद्धीविनायक सभागृह – विक्रोळी पूर्व, ग. द. आंबेकर मार्ग (काळेवाडी) सार्वजनिक उत्सव मंडळ – शिवडी, बाल मित्र मंडळ सार्वजनिक उत्सव मंडळ बोलेवाडी, दादर, युवा मित्र मंडळ, वांद्रे, खेरनगर गणेशोत्सव मंडळ – वांद्रे (प), बेलासीस रोड, बी आय टी चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ – मुंबई सेंट्रल

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here