स्काउट म्हणून मिरवत असताना आपल्या ड्रेसची (scout dress) योग्य निवड करायला शिकणं खूप महत्वाचं आहे. scout dress मुळे तुम्ही रुबाबदार दिसता. त्यासाठी योग्य पारख हवी. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की स्काउट ड्रेसमध्ये काय काय असायला हवे:
शर्ट
हाफ किंवा रोल्ड-अप-स्लीव्ह असलेला व टू पॅच पॉकेट्स असलेला स्टील ग्रे शर्ट. हा शर्ट निवडताना एक ध्यानात ठेवा की थंडीच्या दिवसांत फोल्ड केलेली स्लीव्ह्ज मोठी झाली पाहिजे. जेणेकरुन मुलांना थंडी लागणार नाही.
ट्राउझर्स
नेव्ही ब्लू शॉर्ट्स किंवा ट्राउझर्स तुम्हाला नक्कीच शोभून दिसतील. खूपच सैल किंवा फिटिंग नसावे, सुटसुटीत असावे. त्यात दोन्ही बाजूला खिसे आणि एक मागचा खिसा असावा.
(हेही वाचा Pune : वेताळ टेकडीवर आढळल्या २ नशेबाज विद्यार्थिनी, अभिनेते रमेश परदेशींनी व्हायरल केला व्हिडियो)
कॅप
डार्क ब्ल्यू कॅप म्हणजे कोणत्याही स्काउटसाठी अभिमानाची बाब. वर दिलेल्या स्काउट ड्रेसवर डार्क ब्ल्यू कॅप खूपच शोभून दिसेल.
बेल्ट
स्काउट ड्रेसचा (scout dress) बेल्ट हा महत्वाचा भाग आहे. आणि बेल्ट नसेल तर शोभा येणारच नाही. म्हणून बेल्ट घ्यायला विसरु नका.
स्कार्फ
हिरवा, जांभळा किंवा पिवळा रंग असलेला स्कार्फ खरंच छान दिसतो. स्कार्फची लांबी जास्त नसावी मात्र अधिक आखुडही असता कामा नये.
तर मित्रांनो, अशा प्रकारचा स्काउट ड्रेस (scout dress) तुम्ही आजच घेऊ शकता. तुम्ही ऑनलाईन मागवू शकता किंवा स्वतः जाऊन शॉपिंगही करु शकता. ऑनलाईन तर अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
Join Our WhatsApp Community