आता उपग्रह करणार तुमच्या जमिनीची राखण

जमिन सातबारा उता-यानुसार शाबूत आणि जागेवर आहे का? तसेच, दुस-याची शेती विकत घेताना दिलेल्या पैशांच्या मोबदल्यात जमीन पूर्ण ताब्यात आली आहे का? अशा प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आता उपग्रहाद्वारे काढलेला नकाशा सातबारा उता-याशी जोडला जाणार आहे. त्यानुसार जमिनीची अचूक मोजणी केली जाणार आहे.

राज्यातील बारामती आणि खुलताबाद या दोन तालुक्यांतील प्रत्येकी दहा गावांमध्ये हा उपक्रम राबवण्यास सुरुवात झाली आहे. पुढील दोन वर्षांमध्ये हा उपक्रम राज्यभरात पूर्ण करण्याचा मानस आहे.

एखाद्या शेतक-याची जमीन सातबारा उता-यापेक्षा प्रत्यक्ष जागेवर कमी आहे. त्याच्याकडून सातबारा उता-यानुसार, जमीन महसूल गोळा केला जात असेल तर त्याच्यावर अन्याय होऊ शकतो म्हणून हा अनोखा उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे.

( हेही वाचा: SBI Fraud: स्टेट बॅक ऑफ इंडियाची मागच्या पाच वर्षांत तब्बल ‘इतक्या’ कोटी रुपयांची फसवणूक )

  • मोजणीत होणार मदत, अतिक्रमणे रोखता येणार
  • या नकाशांवरुन शेतक-याच्या हद्दीवरुन इतर जमिनीची मोजणी करणे, हद्द ठरवणे शक्य होईल.
  • जीआयएक्स रेफरन्सिंग मॅपमुळे जमिनीचे नकाशे पाहणे शक्य
  • सरकारी, तसेच खासगी जमिनीवरील अतिक्रमणे टाळता येतील.

जिओग्राफीकल इन्फाॅर्मेशन सिस्टीमची घेणार मदत

शेताचा किंवा जमिनीचा सातबारा उतारा उपद्रहाद्वारे काढलेल्या नकाशाला जोडण्यात येणार आहे. यासाठी जिओग्राफीकल इन्फाॅर्मेशन सिस्टिमचा वापर केला जाणार आहे. यात रोव्हर मशीन वापरुन जमिनीचे किंवा तुकड्याचे अक्षांश व रेखांश मिळतील. हे अक्षांक्ष व रेखांश प्रत्यक्ष जागेच्या ठिकाणी जोडून सातबारा उता-याशी जोडले जातील. त्यातून जमीन सातबारा उता-यानुसार आहे त्या स्थितीत आहे की शेजा-याने कोरुन खाल्ली आहे, याचा उलगडा होणार आहे. ताब्यातील प्रत्यक्ष जमीन कमी असल्याचे समजल्यास त्याला कायद्यानुसार, ती पूर्ववत करता येईल. त्यामुळे हद्दीचे वाद मिटण्यास मदत होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here