सलग दुस-या दिवशी राज्यात ८ जणांना ओमायक्रॉनची बाधा

139

शनिवारी राज्यात नव्या ८ ओमायक्रॉनच्या रुग्णांची भर पडली. यापैकी चार रुग्ण मुंबई विमानतळावरील तपासणीत आढळून आलेत. यासह पुण्यातील सतरा वर्षांची मुलगी तसेच साता-यात एकाच कुटुंबातील तीन सदस्यांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. यात आठ वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. मुंबई विमानतळावरील एक रुग्ण हा छत्तीसगढचा रहिवासी आहे. राज्यातील आता ओमायक्रॉनच्या रुग्णांची एकूण संख्या ४८ वर पोहोचली आहे.

तब्बल चार दिवसानंतर तीन दिवसांना आज शनिवारी ओमायक्रॉनवरील यशस्वी उपचारानंतर सोडण्यात आले. राज्यातील विविध भागांत २० ओमायक्रॉनच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत राज्यात २५ जणांवर यशस्वी उपचार झाल्यानंतर घरी सोडण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. राज्यात सर्वात जास्त ओमायक्रॉनचे रुग्ण हे मुंबईत सापडले असून, आतापर्यंत मुंबईत १८ रुग्णांची नोंद झाली आहे. तर बुलडाणा, नागपूर, लातूर आणि वसई-विरारमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळलाय.

साता-यातील नव्या ३ रुग्णांबद्दल 

एकाच कुटुंबीयातील तीन सदस्यांनी पूर्व आफ्रिकेत प्रवास केला आहे. तिघेही लक्षणेविरहीत आहेत. ८ वर्षांची मुलगी वगळता दोघांचेही लसीकरण झाले आहेत.

पुण्यातील नव्या रुग्णाबद्दल 

१७ वर्षांच्या मुलीला सहसंपर्कातून ओमायक्रॉनची बाधा झाली. ती १८ वर्षांखालील असल्याने तिचे लसीकरण झालेले नाही.

मुंबई विमानतळावर आढळलेल्या ४ नव्या रुग्णांबाबत

  • ३२ वर्षीय केरळचा रहिवासी, ३१ वर्षीय जळगावचा रहिवासी दक्षिण आफ्रिकेहून ६ डिसेंबरला मुंबईत परतले. दोघांनाही कोरोनची कोणतीही लक्षणे नव्हती. दोघांपैकी केरळच्या रहिवाश्याने फायझर तर जळगावच्या रहिवाशाने कोविडशिल्डच्या दोन्ही लशीच्या मात्रा घेतल्या आहेत.
  • ४८ वर्षीय छत्तीसगढचा रहिवासी टांझानियाहून ११ डिसेंबरला मुंबईचा प्रवास केला. या रुग्णाने कोरोनाप्रतिबंधात्मक लस घेतलेली नाही. या रुग्णामध्येही कोरोनाची कोणतेही लक्षणे आढळून आलेली नाहीत.
  • ४९ वर्षीय युकेचा रहिवासी असलेला रुग्ण १२ डिसेंबरला मुंबईत आला. या रुग्णाने एस्टाझेन्काच्या लशीच्या मात्रा घेतल्या असून या रुग्णामध्येही कोणतेही कोरोनाची लक्षणे नाहीत, अशी माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली.

राज्यांत या भागांतील ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद (आतापर्यंत)

मुंबई – १८, पिंपरी चिंचवड – १०, पुणे ग्रामीण – ६, पुणे मनपा – ३, सातारा – ३, कल्याण-डोंबिवली – २, उस्मानाबाद -२, बुलडाणा -१, नागपूर – १, लातूर- १, वसई-विरार- १

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.