संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आगामी 14 मार्च पासून सुरू होण्याची शक्यता आहे. यावेळी राज्यसभा आणि लोसभा दोन्ही सभागृहाचे कक्ष आणि गॅलरी पूर्वीप्रमाणे वापरात येईल. यासंदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू आणि लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या भागासाठी आसन व्यवस्थेवर चर्चा केली. दोन्ही सभागृहांच्या सरचिटणीसांनी देशातील कोरोनाची तिसरी लाट आणि व्यापक लसीकरणाच्या संदर्भात या मुद्द्यावरही चर्चा केली.
11 फेब्रुवारीपासून दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा 31 जानेवारी रोजी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरू झाला होता. त्याच दिवशी आर्थिक आढावा सादर करण्यात आला आणि 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022-23 या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला होता. त्यानंतर 11 फेब्रुवारीपासून दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित करण्यात आले होते.
(हेही वाचा – अब्दुल सत्तारांना नोटीस बजावण्याचे आदेश, वाचा काय आहे प्रकरण?)
CCPA recommends part one of Parliament's Budget Session from Jan 31 to Feb 11; part two from March 14 to April 8: Sources
— Press Trust of India (@PTI_News) January 14, 2022
अधिवेशन दोन टप्प्यात
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं अधिवेशन दोन टप्प्यात घेण्यात येत आहे. देशात कोरोना रुग्णांची आकडेवारी मोठ्या प्रमाणात वाढत असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत काळजी घेत हे अधिवेशन होत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनावर वाढत्या कोरोनाचे सावट असल्याने त्या पाश्वर्वभूमीवर राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दोन्ही सभागृहांच्या महासचिवांना कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरक्षित पार पाडण्यासाठी प्रभावी उपाययोजना सुचवण्याचे निर्देश दिले होते.
Join Our WhatsApp Community