हवीहवीशी ती पु्न्हा झाली नकोशी; राज्यात मुलींचे लिंग गुणोत्तर प्रमाण घटले

आपण स्वत: ला पुरोगामी म्हणतो. बेटी बचाव, बेटी पढाओ चा नाराही देतो. प्रत्यक्षात मात्र स्थिती वेगळी आहे. महाराष्ट्रात मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्माचे प्रमाण तीन वर्षांपासून सातत्याने घटत असून, ते 919 वरुन 906 वर आले आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून ही बाब उघडकीस आली आहे.

( हेही वाचा: प्रबोधनकार हिंदू धर्माभिमानी होते; आजोबांचे विचार वाचा म्हणणाऱ्यांना राज ठाकरेंचे प्रत्युत्तर )

2019 पूर्वी समाधानकारक

समाधानाची बाब म्हणजे 2019 च्या ाधी सलग दोन वर्षे मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढत होते. सन 2017 ला हे लिंग गुणोत्तर 913 ( 9 लाख 44 हजार मुले, 8 लाख 62 हजार मुली) सन 2018 मध्ये 916 ( 9 लाख 21 हजार मुले, 8 लाख 43 हजार मुली) व 2019 मध्ये ते 919 ( 9 लाख हजार 10 हजार मुले, 8 लाख 36 हजार मुली) असे समाधानकारक नोंदवले गेले होते. मुलींना गर्भातच खुडणा-या डाॅक्टर सुदाम मुंढेच्या बीड जिल्ह्यात हे प्रमाण 898 आहे. पुण्यात ते 2019 ला 905,2020 ला 924 तर 2021 ला 911 इतके नोंदवले गेले.

बेकायदेशीर लिंग तपासणीवर कडक कारवाई केली जात आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या काळातही पीसीपीएनडीटी कायदा आणि त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे केली आहे. – डाॅक्टर नितीन आंबेडकर, आरोग्य संचालक, महाराष्ट्र राज्य

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here