आधी विमानांना बंदूकीने दिला जात होता सिग्नल

सध्या विमानांच्या लॅंडिग आणि टेकऑफसाठी आधुनिक सिग्नल यंत्रणेचा वापर केला जातो, परंतु कधी काळी विमानांना सिग्नल देण्यासाठी बंदुकांचा वापर होत होता. या बंदुकांच्या वापराने विविध रंग हवेत उडवून सिग्नल देण्यासाठीच त्यांचा वापर करण्यात येत होता. त्या काळी वापरल्या गेलेल्या बंदुका चिकलठाणा विमानतळावर जतन करुन ठेवण्यात आल्या आहेत.

( हेही वाचा: रिक्षा परवाना वाटपावर येणार मर्यादा ? )

सिग्नलसाठी असा केला जात होता बंदुकीचा वापर 

स्वातंत्र्यापूर्वीच 1936 मध्ये औरंगाबादचे विमानतळ कार्यान्वित झाले होते. त्यावेळी फ्लेअर गन अथवा व्हेरी पिस्टल अशी नावे असलेल्या बंदुकींनी सिग्नल दिला जात असे. व्हेरी पिस्टल हे नाव युनायटेड स्टेट्स नेव्हीचे लेफ्टनंट एडवर्ड डब्ल्यू, व्हेरी या शोधकर्त्यांच्या नावावरुन पडले. त्यांनी सिंगल अॅक्शन फायरिंग मेकॅनिझमसह मोठ्या कॅलिबर सिंगल शाॅट पिस्तूलचा शोध लावला, जे हवेत विशेष फ्लेअर्स उडवू शकतात. संकटात असताना, सिग्नल पाठवण्यासाठी तसेच मदतीसाठी या पिस्टलचा वापर केला जात होता. लाल, हिरवा, पांढरा या तीन रंगांद्वारे सिग्नल देण्यात येत असे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here