मुंबईतील प्रसिद्ध Bandra Bandstand चा इतिहास तुम्हाला माहिती आहे का ?

4684
मुंबईतील प्रसिद्ध Bandra Bandstand चा इतिहास तुम्हाला माहिती आहे का ?
मुंबईतील प्रसिद्ध Bandra Bandstand चा इतिहास तुम्हाला माहिती आहे का ?

मुंबईतील (Mumbai) पश्चिम किनाऱ्यावर आजमितीस हॉटेल ताज लँड्स एन्ड जिथे आहे, तिथून पुढे साधारण सव्वा किलोमीटरचा समुद्रालगतचा पट्टा वांद्रे बॅण्डस्टॅण्ड (Bandra Bandstand) प्रोमोनेड म्हणून प्रसिद्ध आहे. या रस्त्यावर अनेक लोक मनमुरादपणे फिरताना, कसरती करताना, समुद्राचा, सूर्योदयाचा आणि सूर्यास्ताचा आनंद लुटताना दिसतात.

(हेही वाचा – १९९९ पासून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची लालसा ; Sanjay Shirsat यांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप)

वांद्रे फोर्ट आहे प्राचीन वास्तू

या परिसराचा बॅण्डस्टॅण्ड म्हणून नेहमीच उल्लेख केला जातो. या परिसराच्या इतिहासात जेव्हा आपण डोकावतो, तेव्हा पहिली वास्तू डोळ्यासमोर येते ती म्हणजे वांद्र्याचा किल्ला अर्थात वांद्रे फोर्ट. (Bandra Fort) हा किल्ला हॉटेल ताजला लागून आहे. पोर्तुगीजांनी माहीमच्या समुद्रात पाळत ठेवण्यासाठी उत्तरेकडील साष्टी (साल्सेट) बेटावर सन १६४०मध्ये त्याची उभारणी केली. सन १७७४ मध्ये हा किल्ला ब्रिटिशांकडे आला. किल्ल्याजवळ प्रार्थनास्थळ असावे म्हणून माऊंट मेरी चर्चची उभारणी १६४०मध्ये झाली.

असा बांधला गेला बयरामजी जीजीभॉय रोड

वांद्रे हा साष्टी बेटाचा नैऋत्येकडील भाग होता. कालांतराने अनेक छोटी गावे तिथे वसली. मुंबईत वसाहत वाढली आणि नानाविध लोक येथे येऊन घरे बांधू लागले. आजच्या कॅफे सीसाइडपासून काही अंतरावर आपण ज्याला बॅण्डस्टॅण्ड प्रोमोनेड म्हणतो, तो किनाऱ्यालगतचा रस्ता सर बयरामजी जीजीभॉय या दानशूर पारशी समाजसेवकाने बांधला. सर बयरामजी जीजीभॉय यांचे १८९०मध्ये निधन झाले. आजही बॅण्डस्टॅण्ड प्रोमोनेड अधिकृतपणे बयरामजी जीजीभॉय रोड म्हणून ओळखला जातो.

आज हॉटेल ताज लँड्स एन्डच्या दिशेने जाताना उजव्या हाताला कॅफे सी साइडच्या पुढे एक उद्यान आहे. त्याच्या प्रवेशद्वाराच्या खांबावर ‘बॅण्डस्टॅण्ड पार्क-बी’ असे बृहन्मुंबई महापालिकेने कोरलेले आहे. या उद्यानाच्या मध्यभागी निळ्या रंगाच्या काँक्रीटच्या आठ खांबांवर अष्टकोनी छत आहे. त्यावर एक घुमट आहे. हेच ते वांद्रे बॅण्डस्टॅण्ड! इंग्रजांच्या काळात लाकडी बांधकाम होते, मात्र नंतर त्याचे काँक्रिटीकरण झाले. स्थानिक रहिवाशांच्या सांगण्यानुसार याची बांधणी दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस झाली. इंग्रज गेल्यावर बॅण्डचे संगीत शांत झाले. पण, या परिसराचे नाव मात्र अजून तसेच आहे.

(हेही वाचा – Sanjay Jaiswal : शाहबानो प्रकरणाप्रमाणेच काँग्रेसला राममंदिराचा निर्णय बदलायचा आहे; काय म्हणाले संजय जयस्वाल ?)

आवडते सेलिब्रिटी हँगआउट

अगदी १९७०पर्यंत या परिसरात फक्त बंगले होते. किनाऱ्यावर येथील स्थानिक लोक पोहायला आणि मासे पकडायला जायचे. मात्र, संध्याकाळी येथे शुकशुकाट असायचा. त्यामुळे कालांतराने पडीक झालेला वांद्रे किल्ला तस्करीसाठी प्रसिद्ध होता.

सन १९७८मध्ये लुथरिया बंधूंनी सी रॉक हॉटेल बांधले आणि या परिसराला नवीन ओळख मिळाली. हे हॉटेल ८० आणि ९०च्या दशकातील एक आवडते सेलिब्रिटी हँगआउट होते. तेथील ‘पॅलेस ऑफ द वेस्ट एम्प्रेस’ हे फिरते रेस्टॉरंट खूपच लोकप्रिय होते. शिवाय येथील डिस्को आणि कॉफी शॉपचा लौकिक पाहता पाहता वाढला. हॉटेलमध्ये बॉलीवूडचे बडे लोक, तसेच अनेक मोठे आणि प्रसिद्ध उद्योगपती वरचेवर येत असत. परिणामी या परिसरात वर्दळ वाढू लागली. किनाऱ्यावर फेरफटका मारणाऱ्या सामान्य लोकांचेसुद्धा प्रमाण वाढू लागले. पण १९९३च्या साखळी बॉम्बस्फोटात या सी रॉक हॉटेलचे खूप नुकसान झाले. अनेक वर्षे ते पडीक अवस्थेत होते. शेवटी २०१०मध्ये ते जमीनदोस्त केले. नंतर सी रॉक हॉटेलच्या जागेजवळच हॉटेल ताज लँड्स एन्ड बांधले गेले.

सांस्कृतिक जगतात विशेष स्थान

सन १९७१पासून वांद्रे येथे समुद्र हटवून भराव घालणे सुरू झाले. पूर्वीचे काही मोजके दगडी बंगले अजूनही दिसतात. आता मात्र, वांद्रे प्रोमोनेडसमोर अनेक उंच इमारती अगदी थाटात उभ्या राहिल्या आहेत. बॉलीवूडचे अनेक बडे लोक येथे राहतात. एक श्रीमंत वस्ती असलेली मुंबईची किनारपट्टी असा आता या परिसराचा नावलौकिक आहे. शिवाय आता वांद्रे बॅण्डस्टॅण्डचे सांस्कृतिक जगतात विशेष स्थान आहे. वांद्रे बॅण्डस्टॅण्डच्या (Bandra Bandstand) एका टोकाला एक अँफीथिएटर आहे, जे प्रामुख्याने ‘सेलिब्रेट वांद्रे’ या उपनगरातील द्विवार्षिक सांस्कृतिक उत्सवासाठी बांधले गेले आहे. इतर वेळेससुद्धा येथे संगीत आणि नृत्याचे कार्यक्रम होतात. लाइव्ह परफॉर्मन्ससाठी आणखी एक ठिकाण म्हणजे आर्टिस्ट कॉर्नर. रविवारी जेव्हा वांद्रे बॅण्डस्टॅण्ड विशेषत: गजबजलेले असते, तेव्हा येथे ‘पब्लिक जॅम सेशन्स’चा आनंद लुटता येतो.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.