सोलापूर-कोल्हापूर मार्गावरील सोलापूर-मिरज एक्सप्रेस मार्च 2020 पासून कोरोनामुळे बंद करण्यात आली. ही गाडी कुर्डूवाडी स्थानकाहून मार्गस्थ होते. त्यामुळे सोलापूर-मिरज एक्सप्रेस बंद असल्याने मिरजकडे जाणा-या अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची तसेच रुग्णांचीही मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे मिरज एक्सप्रेस सुरु करण्यास रेल्वे प्रशासनास केंव्हा मुहूर्त मिळणार असा प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे.
खासगी वाहनांचा आधार
मार्च 2020 पासून कोरोनामुळे रेल्वेची प्रवासी सेवा ठप्प झाली होती. मात्र कोरोनाची दुसरी लाट ओसल्यानंतर हळूहळू सर्व व्यवहार आणि 80 टक्के गाडया पूर्ववत सुरु झाल्या. मात्र सोलापूर-कोल्हापूर, आणि सोलापूर-मिरज त्याचबरोबर सोलापूर-पुणे सकाळी धावणारी डेमू पॅसेंजर, आणि पुणे-सोलापूर डेमू पॅसेंजर, सोलापूर-मनमाड-नागपूर व्दिसाप्ताहिक या गाडया अद्यापही बंद असल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.
प्रवाशांची गैरसोय
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. रेल्वे प्रशासनाकडून या गाड्या पुन्हा सुरू करण्यास प्रतीक्षा करावी लागणार आहे असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. या महत्वाच्या रेल्वे गाड्या बंद असल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. राज्यातील इतर रेल्वे, एक्सप्रेस गाड्या सुरू झालेल्या आहेत. यामुळेच लवकरात या स्थानिक रेल्वे गाड्याही सुरू कराव्यात अशी मागणी सोलापूरच्या प्रवाशांनी केली आहे.
Join Our WhatsApp Community