घरी ३१ डिसेंबरची पार्टी करताय! पालिकेची असणार नजर

138

ख्रिसमस आणि वर्षा अखेर ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत. राज्य सरकारने दक्षता घेत रेसकोर्स सारख्या मोठ्या मैदानात मोकळ्या जागेंवर होणाऱ्या पार्ट्यांकरता नियमावली जारी केली आहे. माहिती आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोकळ्या जागी होणाऱ्या जंगी कार्यक्रमांना केवळ २०० लोकांनाच परवानगी देण्यात आली असून बँन्क्वेट हॉल, बंदीस्त जागी क्षमतेच्या ५० टक्के मर्यादेपर्यंतच प्रवेश दिला जाणार आहे. इतकेच नाही तर घरी होणाऱ्या पार्ट्यांवर देखील पालिकेची नजर राहणार आहे. यावेळी लोकांनी स्वयंशिस्तीचे पालन करावे असे आवहनही आयुक्त इकबालसिंह चहल यांनी केले आहे.

असे असणार पालिकेचे नियम

  • बँन्क्वेट हॉल, बंदीस्त जागी क्षमतेच्या ५० टक्के मर्यादेपर्यंतच प्रवेश दिला जाणार आहे
  • मोकळ्या जागांवर क्षमतेच्या २५ टक्के लोकांनाच परवानगी मिळणार
  • ३१ डिसेंबर आणि ख्रिसमस निमित्त घरी होणाऱ्या पार्ट्यांवर पालिकेची नजर राहणार
  • नियमांचं उल्लंघन करणाऱ्या संबंधित रेस्टॉरंट मालक, हॉटेल मालक यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई होणार
  • मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये महापालिकेची ४ पथकं तैनात असणार

(हेही वाचा- प्रवाशांचा खोळंबा! रविवारी मध्य रेल्वेच्या ‘या’ मार्गावर मेगाब्लॉक)

३१ डिसेंबर आणि ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे, असे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश ककाणी यांनी सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.