विधानभवनाच्या आवरातील शिवरायांचा पुतळा बदलणार

130
मुंबईतील विधानभवनाच्या आवारात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आता बदलला जाणार आहे. त्यासाठी विधिमंडळाकडून पुतळा समितीची स्थापना करण्यात आली आहे. सोमवारी या समितीची पहिली बैठक आयोजित करण्यात आली आहे.
सध्या विधानभवन परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनावर आरूढ असलेला पुतळा आहे. या पुतळ्याबाबत काही आमदारांनी आक्षेप नोंदवले होते. त्याची दखल घेत हा पुतळा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी स्थापन केलेल्या पुतळा समितीत विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद उपसभापती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार रामराजे निंबाळकर, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा समावेश आहे.

सिंहासन पुतळ्यापेक्षा मोठे

सध्या विधानभवन परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनावर आरूढ असलेला पुतळा आहे. मात्र, हे सिंहासन महाराजांच्या पुतळ्यापेक्षा मोठे आहे. त्याशिवाय, महाराजांच्या पुतळ्यावरचे भाव, तेज कमी दिसत असल्याने प्रभावी वाटत नसल्याचा मुद्दा काही आमदारांनी उपस्थित केला आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.